हेमंत ढोमे यांच्या शाळेत ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’चा संगीत अनावरण सोहळा

रत्नाकर मतकरींचं ‘स्वर्गात आकाशगंगा’ नव्या अंदाजात


‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘शाळा मराठी’ला प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता दुसरं गीत ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे शाळेतल्या आठवणींना उजाळा देणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचा अनावरण सोहळा अगदी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेतील पटांगणात पार पडला. चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या विद्यार्थीदशेतील अनेक आठवणी या शाळेशी जोडल्या असून याच शाळेच्या मंचावर हेमंत यांनी पहिल्यांदा नाटकात काम केलं. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक जिव्हाळ्याचा सोहळा असून शाळेला दिलेली एक मानवंदना आहे. यावेळी क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, कादंबरी कदम यांच्यासह गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर, संगीतकार हर्ष- विजय उपस्थित होते.


या खास सोहळ्यात चित्रपटातील कलाकार हजारो विद्यार्थ्यांसोबत गाण्यावर थिरकले. विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि मैदानात दुमदुमलेलं आनंदी वातावरण यामुळे हा गाण्याचा अनावरण सोहळा धमाकेदार ठरला. शिक्षक, विद्यार्थी आणि चित्रपटाची टीम सगळ्यांनी मिळून हा क्षण संस्मरणीय बनवला. सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं हे कालातीत गीत आजही प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्याच्या मनात घर करून आहे. संगीतकार हर्ष-विजय यांनी या लोकप्रिय गाण्याला आधुनिक आणि नॉस्टॅल्जिक असा सुंदर स्पर्श देत नव्याने सादर केलं आहे.


गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या आवाजातील मधुर भावस्पर्शी गोडवा या गाण्याला आणखी मोहक करतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ १ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Comments
Add Comment

अनिरुद्ध आणि काव्या मारनचा नोव्हेंबरमध्ये पार पडणार विवाहसोहळा; पत्रिकेने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालक काव्या मारन यांच्या विवाह सोहळ्याच्या आमंत्रण

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांच्या प्रकृतीबाबत करीनाचा खुलासा, प्रसिद्ध टिव्ही शोमध्ये बेबोनं सर्व सांगितलं

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने तिच्या वडीलांच्या तब्येतीविषयी माहिती दिलेली आहे. अलीकडेच

Music Concert Safety Tips : म्युझिक कॉन्सर्टला जाताय ? तुमचा अनुभव सुरक्षित आणि खास बनवण्यासाठी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी!

संगीत मैफिलीचा (Music Concert) आनंद घेणे हा एक उत्तम अनुभव असतो; मात्र गर्दी आणि घाईगडबडीत लहान-सहान चुकांमुळे तुमचा मूड

विजय-रश्मिकाच्या नात्याबाबत खोट्या पोस्टचा सुळसुळाट? मॅनेजरची पोलिसांत तक्रार

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या एका शोमधील व्हिडिओज वायरल होत आहेत.

King Movie : ओठांवर गुलाब, डोळ्यांत आग! शाहरुख खानचा ‘किंग’मधील खतरनाक अवतार चर्चेत; रिलीजची तारीखही ठरली

King Movie: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आता या

मराठी चित्रपट जागतिक व्यासपीठावर सादर होणार, मुंबईत 15 नोव्हेंबरपासून ‘चित्रपताका’ महोत्सवाचे आयोजन

मुंबई: मराठी सिनेमाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव’चे