‘शंकर जयकिशन’ची तालीम थेट हैदराबादला!

मराठी रंगभूमीवर लवकरच दाखल होणाऱ्या सुरज पारसनीस दिग्दर्शित ‘शंकर जयकिशन’ या नाटकाची तालीम थेट हैदराबादला होतेय. साधारणत: नाटकांच्या तालमी या मुंबई-पुण्यात किंवा कलाकारांच्या उपलब्धतेनुसार महाराष्ट्रातच होतात; परंतु हे ऐकून नाटकप्रेमींसुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत.


नाटकातील मुख्य भूमिका साकारत असलेले महेश मांजरेकर सध्या एका महत्त्वाच्या दाक्षिणात्य चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबादमध्ये करत आहेत. चित्रपटाचे शूटिंग आणि नाटकाची तालीम या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळताना नाटकावर परिणाम व्हायला नको, या विचारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नाटकाची टीम काही दिवसांपासून हैदराबादमध्येच मुक्काम करून आहे. महेश मांजरेकर सध्या अक्षरशः डबलशिफ्टमध्ये काम करत असून दिवसा दाक्षिणात्य चित्रपटाचे शूटिंग आणि संध्याकाळपासून ‘शंकर जयकिशन’ नाटकाची तालीम चालू आहे. त्यांच्या काम करण्याच्या वेगाने आणि समर्पणाने संपूर्ण टीमलाच नवसंजीवनी मिळाली आहे. त्यांचा डेडिकेशन पाहून तिथे उपस्थित टीमलादेखील प्रचंड प्रेरणा मिळत असल्याचं समजतं. भरत जाधव यांच्यासह संपूर्ण तांत्रिक आणि कलात्मक मंडळींच्या सहकार्यामुळे नाटक अधिक दमदार व्हावं, यासाठी सर्वजण मनापासून प्रयत्न करत आहेत. भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित सुरज पारसनीस दिग्दर्शित या नाटकाचे लेखन विराजस कुलकर्णी याने केले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे गीत आणि अजित परब यांचे संगीत लाभलेल्या या नाटकात शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनोद, भावना आणि नात्यांचे सुंदर मिश्रण असलेल्या ‘शंकर-जयकिशन’ या नाटकाचा शुभारंभ १९ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे
होणार आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या