कालनिर्णय मराठीसह सात भाषांमध्ये प्रकाशित

मुंबई : एक कोटीहून अधिक घरांच्या भिंतीवर विराजमान असलेले 'कालनिर्णय' हे सुमंगल प्रकाशनाद्वारे मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नडा, तमिळ आणि तेलुगू या सात भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. पंचांग, भविष्य, सणवार, तिथी नक्षत्रे, शास्त्रार्थ ही 'कालनिर्णय 'ची प्रमुख अंगे असून पंचांग जनसामान्यांसाठी सोपे व सुलभ करण्याचा सांस्कृतिक 'रिफॉर्म' 'कालनिर्णय'ने पन्नास वर्षांपूर्वीच केला.


समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून, वेगवेगळ्या धाटणीचा ग्राहकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून त्यानुसार छान छोटे कालनिर्णय, मॅग्नेट, श्री स्वामी समर्थ अवधूत पंचांग, नोटपॅड, स्वादिष्ट, आरोग्य, मोठे ऑफिस (मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती), छोटे ऑफिस (मराठी, इंग्रजी), मीडिअम (मराठी, इंग्रजी), थ्री इन वन क्युबिकल, कार (मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी), डेस्क (मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी), मिनी, मायक्रो, वर्षचंद्रिका, मंथली प्लॅनर, स्लिम ब्ल्यू नोट फोर्टनाइटली प्लॅनर, स्लिम रेड नोट मंथली प्लॅनर व इयर प्लॅनर अशा विविध प्रकारांतील आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. देशातील पहिली वेबसाइट, ॲप अशा उपक्रमांद्वारे 'कालनिर्णय' नेहमीच काळाबरोबर चालत आले आहे.


विविध उपक्रमांद्वारे ५० वर्षांहून अधिक काळापासून 'कालनिर्णय 'ने मराठी माणसावरच नव्हे, तर भारतीय मनावर आपला सांस्कृतिक ठसा नक्कीच उमटवला आहे. 'कालनिर्णय' हे जगातील सर्वाधिक खपाचे प्रकाशन आहे हे आपणास ज्ञात आहेच आणि हा बहुमान 'कालनिर्णय 'ला 'ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन' (ABC*) या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिला आहे. 'कालनिर्णय'ने लोकांच्या गरजा लक्षात घेऊन उपयुक्त प्रकाशने वेळोवेळी उपलब्ध करून दिली आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत, साडे सात तासानंतर सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 9.30 च्या दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य

Breaking : भांडुप स्थानकात ट्रॅक ओलांडताना एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी अंत

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सकाळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

मुंबईत आठवड्यातून एक दिवस बांधकामे बंद ठेवा; वायुप्रदूषण रोखण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांची महापालिका आयुक्तांना सूचना

मुंबई : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी संपूर्ण मुंबई महापालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस

लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावणे किंवा बोलणे पडणार महाग!

रेल्वेतून प्रवास करताना मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, व्हिडिओ पाहणे किंवा मोठ्याने फोनवर गप्पा मारणे

Mumbai Crime: पत्नीशी वाद अन् बाळाला स्कायवॉकवरून फेकल्याचा आरोप; पिता अटकेत

मुंबई : मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पत्नीशी झालेल्या

Attack on Tiger Shroff : टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी ११ वा आरोपी अटकेत; ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी ११ व्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. प्रांजल ठकराल (वय 22) असे