किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट’च्या सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्या तब्बल २९ मजुरांचे दहशतवादी संबंध आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पडताळणीत समोर आले असून, यामुळे प्रकल्पस्थळी मोठा धोका निर्माण झाला आहे.


१ नोव्हेंबर रोजी किश्तवाडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नरेश सिंह यांनी प्रकल्पाचे काम करणाऱ्या 'मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड'च्या व्यवस्थापनाला एक पत्र लिहिले आहे. पोलिसांनी केलेल्या सुरक्षा पडताळणीनुसार, प्रकल्पावर कार्यरत असलेल्या ५ मजुरांचे थेट दहशतवाद्यांशी नातेसंबंध आहेत. तपासणीत असे आढळले की, एका कर्मचाऱ्याचा काका हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी मोहम्मद अमीन आहे. प्रकल्पातील इतर दोन मजूर हे याच दहशतवाद्याचे सख्खे भाऊ आहेत. एका कर्मचाऱ्याचे वडील माजी दहशतवादी असून त्यांनी आत्मसमर्पण केले आहे, तर दुसऱ्या एका मजुराचे वडील 'ओव्हर ग्राउंड वर्कर' म्हणून पोलिसांच्या दप्तरी नोंद आहेत. उर्वरित २४ कर्मचाऱ्यांवर विविध गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी 'मेघा इंजिनिअरिंग' कंपनीला या २९ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा फेरविचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अशा संशयास्पद हालचाली करणाऱ्या मजुरांवर कडक पाळत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 24 व्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी; 30 ऑक्टोबर रोजी हप्ता जमा होण्याची शक्यता

नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-Kisan) लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली

PM Modi Chinmaya Amrit Mahotsav : 'देशाच्या विकासासाठी एकत्र या'; चिन्मय अमृत महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महत्त्वाचे भाषण

नवी दिल्ली : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपण जो 'अमृत महोत्सव' साजरा केला, तो केवळ एक

Air India Emergency Landing : एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ करताच घेतला यू-टर्न; 109 प्रवाशांचा जीव मुठीत

हैदराबाद: उड्डाण भरताच विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे प्राण कंठाशी आले. हैदराबादहून

Loktak Lake Manipur : 'लोकटक तलावा'च्या संवर्धनासाठी मणिपूर सरकारचा मोठा निर्णय, 'लोकटक दिन' आता राज्य महोत्सव

इंफाळ : ईशान्य भारतातील सर्वांत मोठ्या गोड्या पाण्याच्या 'लोकटक तलावा'चे सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि आर्थिक

Uttar Pradesh : महोबा जिल्हा रुग्णालयात बैलांची एन्ट्री ! इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांची धावपळ; घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात

India china border dispute : अरुणाचल सीमेवर भारत-चीन गतिरोध कायम, आयटीबीपी प्रमुखांचा मोठा खुलासा!

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सीमेवर अद्यापही तणावाचे वातावरण कायम असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.