काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यासही भाजपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यास यांनीही अखेर भाजपच्या झेंडा हाती घेतला. धर्मेश व्यास यांनी मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. धर्मेश व्यास हे माजी नगरसेवक असून काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान पदाधिकारी होते. काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांच्या फळीतील हे पदाधिकारी होते.


धर्मेश व्यास हे सांताक्रुज पूर्व येथील प्रभात कॉलनी, आनंद नगर परिसरातील प्रभाग क्रमांक ८१ मधून २००७ ते २०१२ या कालावधी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. तर त्याआधीच्या कालावधीत ते नगरसेवकाचे जात वैधता प्रमाणपत्र बाद झाल्याने दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली होती. धर्मेश व्यास वकील असून अनेकदा काँग्रेसची कायदेशीर बाबी त्यांनी हाताळल्या आहेत.


गुरुदास कामत यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू असलेले समीर देसाई यांनी प्रथम भाजपा आणि नंतर उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. तर राजहंस सिंह यांनी भाजपात याआधीच प्रवेश करत ते भाजपावासी झाले आहेत. त्यानंतर आता धर्मेश व्यास यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. तर शिवजी सिंह आणि अमरजित सिंह मनहास हे अजूनही काँग्रेसमध्ये राहिले आहेत. व्यास यांच्या पक्ष प्रवेश प्रसंगी भाजपा नेते प्रवीण दरेकर, भाजपाचे नेते मधु चव्हाण, माजी नगरसेवक महेश पारकर, आदी उपस्थित होते. पक्ष प्रवेश केल्यानंतर व्यास यांनी भाजपाचे माजी मुंबई अध्यक्ष आणि मंत्री ॲड आशिष शेलार यांची भेट घेतली. यावर्षी शेलार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

Comments
Add Comment

मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश! परदेशी महिलेच्या शरीरातून कोकेनच्या 11 कॅप्सुल ताब्यात

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली

Mumbai Prohibitory Orders: बृहन्मुंबई हद्दीत 25 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी

मुंबई, दि. 22 : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस

FDA Raids : कोकण, नाशिक व छत्रपती संभाजीनगर विभागात लाखो रुपयांचा अमानक अन्नसाठा जप्त; 11 आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई: अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात धडक

Underground Local: पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, नोकरदारांना दिलासा; चर्चगेट- विरार भूमिगत रेल्वे मार्गाचा प्रस्ताव?

मुंबई: पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) चर्चगेट (Churchgate) ते विरार (Virar) स्थानकादरम्यान भूमिगत उपनगरीय रेल्वे (Underground Local) नेटवर्क

Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत थेट तिसरा क्रमांक

Mumbai News: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. IQAir च्या

Land Registration Rules : सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक, फसवणूक रोखण्यासाठी महसूल विभागाचा निर्णय

मुंबई : सामायिक सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांत सहहिस्सेदारांची फसवणूक