पुण्यात महाविकास आघाडीत फूट, आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार


पुणे : पुण्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच तासाभरात महाविकास आघाडी फूटली आहे. आम आदमी पक्षाने (आप) महाविकास आघाडीसोबत निवडणूक न लढवता स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केली आहे. पक्ष पुण्यात १०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शनिवारी पुण्यातील जागा वाटपावर शिक्कामोर्तब केले. काँग्रेस, शिवसेना (उबाठा गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रत्येकी ५० जागा लढविणार असल्याचे घोषित करण्यात आले. तर आप, वंचित व रासप यांना प्रत्येकी १२१५ जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी दिली.


कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुमारे ४ वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी तसेच त्यानंतर झालेल्या लोकसभा, विधानसभेसाठीही ‘आप’ने महाविकास आघाडीसाठी प्रचार केला होता. परंतु, त्याला फारसे यश मिळालेले नाही. घराणेशाही, भ्रष्टाचार, गुंडगिरी आदींबाबत त्यांच्या नेत्यांच्या भूमिका स्पष्ट नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीबरोबर महापालिका निवडणूका न लढविण्याचा निर्णय ‘आप’ने घेतला असल्याचे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी नमूद केले.


प्रदेश प्रवक्ते किर्दत म्हणाले, “महाविकास आघाडीबरोबर मागील निवडणुकीत आपचा सहभाग फायद्याचा ठरला नाही. घराणेशाही, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीसंदर्भात स्पष्ट भूमिका नसल्यामुळे आता आपण स्वतंत्रपणे मैदानात उतरतो.” आपने पुण्यात ४१ उमेदवारांची सूची जाहीर केली असून, मुंबई, पिंपरी-चिंचवड व कोल्हापूरमध्ये प्रत्येकी १५ उमेदवारांची घोषणा केली आहे. नाशिकमधील उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि इतर नेते संजय सिंह, राघव चढ्ढा यांनी प्रचारासाठी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहितीही पक्षाने दिली आहे.


Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर