Mumbai Fire News : साकीनाका परिसरात भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Mumbai Fire News: अंधेरी येथील साकीनाका परिसरातील खैराणी रोड येथे मंगळवारी (20 ऑक्टोबर) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य चार जण भाजल्याने जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, आगीने सुमारे 4,000 बाय 4,000 चौरस फुटांच्या परिसरातील 60 ते 70 व्यावसायिक गाळे आणि चाळींमधील साहित्याला आपल्या कवेत घेतले. या आगीत कपड्यांचा साठा, प्लास्टिक ग्रॅन्युल्स, भंगार साहित्य, लाकडी फर्निचर, एलपीजी सिलिंडर, मशिनरी, इलेक्ट्रिक वायरिंग आणि इतर साहित्य जळून खाक झाले.


या आगीची झळ रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांनाही बसली. दोन दुचाकी आणि एका टेम्पोचे नुकसान झाले आहे. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.



दोघांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरू


अग्निशमन दलाने मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनी आग पूर्णपणे विझवली. त्यानंतर घटनास्थळावरून दोन अनोळखी व्यक्तींचे जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.


या घटनेत भाजलेल्या 4 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले असून, त्यांना अनुक्रमे 80 टक्के आणि 40 टक्के भाजले आहे. उर्वरित जखमींवरही उपचार सुरू आहेत.


आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास केला जाण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

Mumbai : पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई : पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दोन महिलांसह 4 जणांना अटक; शस्त्र मुंबईत आणल्याचा आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या कथित गोळीबार प्रकरणाच्या तपासात दिल्ली

Mumbai Viewing Gallery : मुंबईत समुद्र किनारी तिसरी व्ह्युईंग गॅलरी बनणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांसह पर्यटकांना समुद्राचे विलोभनीय

WEH Toilet Project : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर बनवणार तीन आकांक्षी शौचालय

मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेच्यावतीने आता आकांक्षी शौचालय शहरापाठोपाठ पश्चिम उपनगरांत बांधले जाणार आहे.

BMC Waste Management : मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्रांच्या प्रकल्पांना आता प्रतिसाद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबईतील राडारोडा वाहतूक आणि विल्हेवाटीच्या महापालिकेच्या प्रकल्पाला आता

वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडचे बाधित क्षेत्र ४० हजार चौरस मीटरने वाढले, विकास नियोजन रस्ता आणि कोस्टल रोडची रुंदी वाढवणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई कोस्टल रोड उत्तरचे बांधकाम केले जात असून या प्रकल्प कामांसाठी वर्सोवा ते गोरेगाव