हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत नाही. आपल्या लावणी नृत्याने अवघ्या महाराष्ट्रावर भूरळ घालणारी लोकप्रिय लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील आणि प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना सुरेखा कुडची एकत्र लावणीचा फड गाजवताना दिसणार आहेत. ‘जब्राट’ या आगामी मराठी चित्रपटात या दोघींची एक फक्कड लावणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या ६ फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


या लावणीची झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हिंदवी पाटील आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या ठसकेबाज लावणीची जुगलबंदी यात पाहायला मिळत आहे. ही लावणी सादर करताना आम्ही आनंद घेतला हाच आनंद रसिकांना ही मिळेल असा विश्वास या दोघींनी व्यक्त केला.


किती सावरू पुन्हा पुन्हा
कशा झाकू या खाणाखुणा
नाही बिचाऱ्या पदराचा या गुन्हा


या डॉ.जयभीम शिंदे लिखीत शब्दांना हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांनी आपल्या मोहक अदाकारीने झक्कास रंग भरले आहेत. बेला शेंडेच्या स्वरातील या लावणीला डॉ.जयभीम शिंदे यांनी ठेका धरायला लावणारं संगीत दिलं आहे. या बहारदार लावणीचं नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केले आहे.


‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स हे आहेत. वेशभूषा युगेशा ओमकार यांची आहे. बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर, स्वाती शिंदे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

Comments
Add Comment

Jailer 2 Box Office Collection : रजनीकांतच्या ‘जेलर 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, पाचव्या दिवशी कमावले इतके कोटी

Jailer 2 Box Office Collection  : सुपरस्टार रजनीकांतच्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड सुरू आहे. पहिल्या

Surya Teaser: सनी पाजीच्या वाढदिवशी फॅन्सला जबरदस्त गिफ्ट, 'सूर्या'चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

मुंबई: सनी पाजीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता सनी देओल यांच्या आगामी ‘सूर्या’ या

Marathi Movie Updates: 'ती समोर आली की प्रेमकथा अन् पाठी आली की...', प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरच्या नव्या सिनेमाची घोषणा

लवकरच मराठी चित्रपटसृष्टी एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला घेऊन येत आहे. 'महाराष्ट्राची क्रश' आणि

धडाधड गोळ्या झाडल्या अन्... एका चुकीमुळे टायगर श्रॉफचा जीव वाचला, चौकशीत नेमकं काय समोर आलं?

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ फायरिंग केस प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. फॉरेन्सिक तपासात असा

Aruna Irani : पतीच्या निधनानंतर दोन महिन्यांनी अरुणा ईराणी यांचे कामावर पुनरागमन, भावूक व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, शेवटच्या श्वासापर्यंत..

Aruna Irani : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईराणी यांनी वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगानंतर पुन्हा

Amit Jani: निर्माते अमित जानी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गोळीबारामागील मास्टरमाईंड कोण?

मुंबई: चित्रपट निर्माते अमित जानी यांनी हरियाणातील सोनीपत येथे आपल्या वाहनाचा पाठलाग केल्याची आणि आपल्यावर