Kolhapur Accident News: इनोव्हा-लॉरीची जोरदार धडक: दोघांचा जागीच मृत्यू DYSP वैष्णवी पाटील गंभीर...

कोल्हापूर : कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) म्हणून कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या खासगी वाहनाचा रविवारी पहाटे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुर्दैवाने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बंगळुरूहून कोल्हापूरकडे येत असताना कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ घडला.

वैष्णवी पाटील या आपल्या सहकाऱ्यांसोबत इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या. रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या कारने समोर चाललेल्या एका लॉरीला मागून जोरदार धडक दिली आणि धडक इतकी भीषण होती की इनोव्हा कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची नावे अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाहीत. अपघातामुळे प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. गाडीचेही प्रंचड नुकसान झाल आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. DYSP वैष्णवी पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. इतर दोन जखमींवरही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैष्णवी पाटील यांच्या अपघाताची बातमी समजताच कोल्हापूर पोलीस दल आणि अँटी करप्शन ब्युरोच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोल्हापूरमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी चित्रदुर्ग पोलिसांच्या सतत संपर्कात असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा