अलिबागमध्ये महिला मतदारांचे वर्चस्व

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज


अलिबाग : तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सात गट आणि अलिबाग पंचायत समितीच्या १४ गणासाठी तालुका निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीत दोन लाख एक हजार ९२३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.


अलिबाग तालुक्यातील दोन लाख एक हजार ९२३ एकुण मतदारांपैकी १ लाख ०३ हजार ११७ महिला मतदार, तर पुरुष मतदारांची संख्या ९८ हजार ८०६ इतकी आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. अलिबाग तालुक्यात २६१ मतदान केंद्र असणार आहेत, त्यात एक महिलांसाठी मतदान केंद्र असेल. मतदानासाठी २८७ मतदान कंट्रोल यूनिट व ५७४ बॅलेट यूनिट अधिग्रहीत करण्यात आली आहेत.


अलिबाग तालुक्यात समान नावांची नोंद असलेले ९ हजार ९९७ संभाव्य दुबार मतदार आढळले आहेत, तर छायाचित्र समान असलेल्या मतदारांची पडताळणी केली असता, या ९ हजार ९९७ मतदारांपैकी २ हजार २८२ मतदार दुबार आढळून आले आहेत. आयोगाकडील सूचनांनुसार या मतदारांकडून जोडपत्र १ भरून घेण्यात आलेले आहे. त्यांनी कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार हे लिहून दिलेले आहे.
मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे त्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे आवश्यकती काळजी घेतली जाणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग, तसेच ज्येष्ठ नागरीक मतदारांसाठी स्वतंत्र रांग असणार आहे. अशा मतदारांना प्राधान्याने मतदानाची संधी दिली जाईल तसे त्यांना व्हीलचेअर उपलब्ध करून दिली जाणार आहे.



पंचायत समिती गणनिहाय आरक्षण


वैजाळी, शहापूर, आंबेपूर, आक्षी, काविर (सर्वसाधारण).


किहीम, चेंढरे, चौल, रामराज (सर्वसाधारण स्त्री).


रेवदंडा (नागरिकांचा मागास प्रवर्ग)


आवास, वरसोली (नागरिकांचा मागास प्रवर्ग-स्त्री).


रूईशेत भोमोली (अनुसूचित जमाती).


थळ (अनुसूचित जमाती-स्त्री).


Comments
Add Comment

Raigad Shed Collapse : रायगडमध्ये मोठी दुर्घटना : खालापूरजवळ लॉजिस्टिक वेअरहाऊसचे शेड कोसळले; २० ते २५ कामगार अडकल्याची किंवा जखमी झाल्याची भीती

रायगड : रायगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी वृत्त समोर आले आहे. रायगडमधील खालापूर तालुक्यातील

Panvel Karjat Double Railway Line: पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; प्रवाशांची प्रतीक्षा संपणार?

पनवेलकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पनवेल - कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वेचे काम अंतिम टप्प्यात आले असून

Diveagar Accident : दिवेआगर दुर्घटनेची सखोल चौकशी होणार; दोषींवर कडक कारवाईचे निर्देश

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे.

दिवेआगर बीचवर सहल ठरली शेवटची...; पुण्यातील 8 विद्यार्थी समुद्रात बुडून मृत

रायगड : रायगड जिल्ह्यातील अत्यंत लोकप्रिय आणि सुंदर असलेल्या दिवेआगर बीचवर (Diveagar Beach) एक अत्यंत हृदयद्रावक आणि

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर थरार! चालत्या बसमधून धुराचे लोट अन् काही क्षणातच...; 14 प्रवाशांचा थरारक जीव वाचला

पनवेल : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. पनवेल हद्दीतील

Pen ganpati idol : पेणच्या गणेशमूर्तींचा जगभरात डंका! यंदा ७० लाखांहून अधिक मूर्तींची विक्री; तब्बल २० लाख बाप्पा परदेशात रवाना

पेण : गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2026) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील