Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक नांदेडमध्ये दाखल होणार असल्याने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, ‘ट्रेन ऑन डिमांड’ योजनेअंतर्गत दिल्ली (हजरत निजामुद्दीन), चंदीगड आणि मुंबई येथून नांदेडसाठी विशेष सुपरफास्ट गाड्या चालवण्यात येणार आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी हजरत निजामुद्दीन ते नांदेड (गाडी क्र. ०४४९४/०४४९३) ही विशेष गाडी २३ आणि २४ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता रवाना होईल. ही गाडी पानिपत, आग्रा कॅन्ट, विरांगणा लक्ष्मीबाई झांसी, बीना, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि पूर्णा मार्गे दुसऱ्या दिवशी सायंकाळी नांदेडला पोहोचेल. चंदीगड ते नांदेड (गाडी क्र. ०४५२४/०४५२३) ही विशेष गाडी देखील २३ आणि २४ जानेवारी रोजी सकाळी ०५.४० वाजता चंदीगडहून सुटेल. अंबाला, पानिपत, दिल्ली सफदरजंग, आग्रा, झांसी, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि पूर्णा मार्गे प्रवास करत ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी नांदेडला पोहोचणार आहे.

याशिवाय मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड दरम्यान (गाडी क्र. ०१०४१/०१०४२) विशेष रेल्वे २३ आणि २४ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी येथे थांबेल. परतीच्या प्रवासासाठी २४ आणि २५ जानेवारी रोजी रात्री नांदेडहून गाडी रवाना होईल. या विशेष रेल्वे गाड्यांमुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रातील हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवश्यक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Add Comment

ठाण्यात खळबळ! मासुंदा तलावात 32 वर्षीय महिलेची उडी; पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क!

ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर

Buldhana rabies death : बुलढाण्यात मन हेलावून टाकणारी घटना : पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यानंतर १२ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराबाहेर

Pune Metro: पुणे मेट्रोने दिवाळीनिमित्त पुणेकरांना मोठा दिलासा; 8 नोव्हेंबरला शेवटची मेट्रो केव्हा सुटणार? वाचा वेळापत्रक

पुणे: पुणे मेट्रोने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'पुणे मेट्रो'ने

Nagpur Metro: नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, दिवाळी सणानिमित्त नागपूर मेट्रोच्या वेळेत बदल

नागपूर: दिवाळी सणानिमित्त नागपूर शहरातील मेट्रो सेवा काही ठराविक वेळेपर्यंतच चालू ठेवण्याचा निर्णय 'नागपूर

मोठी बातमी ! दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड

Maharashtra Political News: यंदाची शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवाळी; नवनाथ बन यांचे प्रतिपादन

Maharashtra Political News: राज्यात सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र, मराठवाडा परिसर आणि विदर्भासह