टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा


उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या


मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील सर्व शाळांमधील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्याने यंदा राज्यात सुमारे पावणेपाच लाख उमेदवारांनी परीक्षा दिल्याचा विक्रम झाला. डीएड/बीएड पदविकाधारकांसह कार्यरत शिक्षकांच्या संख्येमुळे यंदा निकालाचा टक्का ८.५३ टक्क्यांपर्यंत वाढला. आगामी काळात कार्यरत शिक्षक आणि डीएड पदविकाधारकांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.


शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतरिम निकाल जाहीर झाला आहे. परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबरला राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात आली. अंतरिम उत्तरसूची १९ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक १ आणि २ च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तरांसंदर्भातील त्रुटी, आक्षेप २७ डिसेंबरपर्यंत मागविण्यात आले होते. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची १३ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर नुकताच अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.


अंतरिम निकाल ऑनलाइन प्रणालीद्वारे उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निकालावर आक्षेप किंवा त्रुटी नोंदविण्यासाठी २१ जानेवारीपर्यंत मुदत आहे. उमेदवारांना त्यांच्या लॉगिनद्वारेच आक्षेप नोंदवता येणार आहेत. अन्य मार्गाने आलेल्या आक्षेपांचा किंवा अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.


या परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख तीन हजार ३३४ उमेदवारांनी पेपर एकसाठी, तर २ लाख ७२ हजार ३३५ उमेदवारांनी पेपर दोनसाठी नोंदणी केली आहे. परीक्षा परिषदेने २०१३ पासून आठ वेळा टीईटी परीक्षा घेतली. परीक्षा दिलेल्या २९ लाख ७४ हजार ६०० उमेदवारांपैकी १ लाख ६ हजार ६६३ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामुळे टीईटीमध्ये पात्र ठरण्याचे सरासरी प्रमाण ३.५ टक्के आहे. आतापर्यंत सर्वाधिक निकाल २०१८ मध्ये ५.१३ टक्के, त्यापूर्वी २-१३ मध्ये ५.०२ टक्के लागला होता. बाकी सर्व परीक्षांचा निकाल २.३ टक्के ते ३.७० टक्के या दरम्यान आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने