अलिबागमध्ये रंगणार राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा

देशातील १९ राज्यांचा असणार सहभाग


६५० नेमबाजांचा लागणार कस

अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथील आरसीएफ स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे २२ ते २६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील फिल्ड इनडोअर अर्चरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलयाझर्स थळ, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया आणि फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. देशातील १९ राज्यांमधील सुमारे ६५० नेमबाजांनी आपला सहभाग या राष्ट्रीय स्पर्धेसाठी नोंदविल्याची माहिती सुभाष नायर यांनी दिली.
राज्यस्तरावर विजय संपादन करणाऱ्या विविध गटातील महिला आणि पुरुष धनुर्धारांच्या नेमबाजीचा कस अलिबाग येथे होणाऱ्या स्पर्धेत पहावयास मिळणार आहे. रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयातील आरसीएफ कुरुळ येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये २२ जानेवारी ते २६ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये ७ वर्षांखालील, १० वर्षांखालील, १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील, १९ वर्षांखालील, वरिष्ठ गट आणि वरिष्ठ अनुभवी धनुर्धर गट असे गट खेळविले जाणार आहेत. ही स्पर्धा महिला आणि पुरुष अशी खेळवली जाणार आहे, असे फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाचे महासचिव सुभाष नायर यांनी सांगितले.
स्पर्धेचा उदघाटन सोहळा २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आरसीएफ स्पोर्ट कॉम्प्लेक्स कुरुळ अलिबाग येथे होणार आहे. या स्पर्धेत नाईन स्पॉट नावाचा धनुर्विद्या स्पर्धेतील प्रकार प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या स्पर्धेत नाईन स्पॉट प्रकार ५ गटात खेळवला जाणार आहे. यामध्ये १० वर्षाखालील, १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील प्रत्येक गटासाठी प्रथम पारितोषिक २५ हजार, द्वितीय पारितोषिक १५ हजार आणि तृतीय पारितोषिक १० हजार रुपये असणार आहे, तर वरिष्ठ गटासाठी प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक २५ हजार रुपये असणार आहे, अशी माहिती सुभाष नायर यांनी दिली.
स्पर्धेचा उदघाटन सोहळ्यासाठी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्सचे कार्यपालक निदेशक हिरडे, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्सचे चिफ मॅनेजर ऍडमिन महेश पाटील, फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, उपाध्यक्ष संजय पिटवा, सहसचिव रितिका नायर, उपाध्यक्ष अनुप देढे, उपाध्यक्ष मनीष जेडली आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाचे महासचिव सुभाष नायर यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Raigad : शारलोट लेक रिकामा, पर्यटनाचा हंगाम कोरडा; माथेरानकरांचा व्यवसाय ठप्प?

रायगड : पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीने फुलणाऱ्या माथेरानच्या पर्यटनाला यंदा शारलोट लेक रिकामा केल्याचा मोठा

Mumbai Goa Highway : कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात वाहनांवर पाण्याची गळती सुरूच

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात भुयारी मार्गामध्ये

Virar Alibaug Corridor : विरार-अलिबाग कॉरिडॉर : शेतकऱ्यांच्या जमिनींचे सक्तीचे भूसंपादन तातडीने स्थगित करा- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : विरार-अलिबाग (Virar-Alibuag) बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची

NMIA : नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईतील कनेक्टिव्हिटी झाली मजबूत

नवी मुंबई विमानतळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (NMIA) केवळ हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातच नव्हे, तर