सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी

खेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड यांच्यावतीने ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.


मूळतः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. या अचानक झालेल्या तारखेतील बदलामुळे खेड तालुक्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अडचणीत सापडले आहेत. ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्र शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) नियोजित असून या परीक्षेसाठी अनेक शिक्षक परीक्षार्थी आहेत. मात्र त्याच कालावधीत त्यांना निवडणूक कर्तव्य देण्यात आल्याने या शिक्षकांना अत्यंत महत्त्वाच्या सीटीईटी परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सांगितले की, सीटीईटी ही शिक्षकांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा असून निवडणूक प्रक्रियेमुळे कोणत्याही शिक्षकाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्यामुळे तहसीलदार यांनी या विशेष परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ७ व ८ फेब्रुवारी रोजी ज्यांची सीटीईटी परीक्षा आहे, अशा शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. निवेदन देते वेळी सचिव धर्मपाल तांबे, संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर, सल्लागार परशुराम पेवेकर यांच्यासह शिक्षक समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Comments
Add Comment

Ratnagiri incident : रत्नागिरीत खाडीत बुडून एकाच कुटुंबातील 4 मुलांचा मृत्यू; एका मुलीचा शोध सुरू

रत्नागिरी : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे खाडीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Ganesh Visarjan Accident : बावनदीतील विसर्जन ठरले ठळक; पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू, वडिलांचे प्राण थोडक्यात वाचले

रत्नागिरी :

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दुचाकी दरीत कोसळली, तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

Chiplun ST Bus Accident : चिपळूणमध्ये मोठा अपघात; दोन एसटी बसेसची धडक, ३० ते ४० प्रवासी जखमी

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक झाल्याची घटना समोर आली आहे. या

Ganpatipule Beach : पर्यटकांची प्रतीक्षा संपली! गणपतीपुळे समुद्रकिनारा खुला, प्रशासनाने दिला सर्तकतेचा इशारा

रत्नागिरी : महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेला गणपतीपुळेचा समुद्रकिनारा अखेर तब्बल 60