अलंकार

नुसता बसून राहणारा
हा ‘गुळाचा गणपती’
दागिना अंगावर नाही
ती ‘लंकेची पार्वती’

हडकुळा मनुष्य जसा
‘काडी पहिलवान’
म्हातारा दिसतोय बघा
जसे ‘पिकले पान’

कंटाळवाणे भाषण
म्हणजे ‘एरंडाचे गुऱ्हाळ’
रागीट मनुष्याला म्हणे
आला ‘आग्यावेताळ’

घराबाहेर न पडणारा
झालाय ‘घरकोंबडा’
अतिशय लहान त्याला
म्हणे ‘तिळाएवढा’

आटोकाट श्रम करता
होई ‘भगीरथ प्रयत्न’
खरपूस मार देण्या
दाखवू ‘चौदावे रत्न’

हट्ट धरून बसणारा
आहे ‘अडेलतट्टू’
अतिशय चैनीत रमणारा
झालाय ‘खुशालचेंडू’

अलंकारिक हे शब्द सारे
गोड वाटती कानाला
सहज फुलवितात आपल्या
मराठमोळ्या भाषेला!
Comments
Add Comment

हिमालयाचा इशारा

भास्कर खंडागळे नेपाळचा महाप्रलय हिमालयाच्या बदलत्या स्वभावाचा आणि हवामानबदलाच्या वाढत्या परिणामांचा इशारा

योग्यवेळी परतफेड

अनिल रा. तोरणे आयुष्यात मिळालेल्या सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळी त्याची परतफेड करतात. राकेश रोशन

आव्हानांना सामोरं जाण्याचा माईंडसेट

डॉ. स्वाती गानू दहावी किंवा बारावीची परीक्षा जवळ आली की, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येतो - “हे सगळं

'देव जरी मज कधी भेटला...'

श्रीनिवास बेलसरे ज्यांना आई नाही अशांना हुरहूर लावणारा एक सिनेमा आला होता सुमारे ६३ वर्षांपूर्वी! तो पाहताना

भाषासक्तीने भाषाप्रेम वाढेल, की भाषाभेद ?

निशा वर्तक भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती व्यक्तीच्या अस्मितेची आणि संस्कृतीची प्रतीक असते. भारतासारख्या

मंगलतीर्थ

भालचंद्र ठोंबरे निमिषारण्यात जमलेल्या अनेक ऋषीमुनींना सुतांनी अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती व महत्त्व