जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस अल्कारेजने इतिहास रचला. त्याने अंतिम फेरीत दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचला पराभवाची धूळ चारली. ही स्पर्धा चौथ्या सेटपर्यंत चालली. पहिल्या सेटमध्ये जोकोविचने बाजी मारली. मात्र त्यानंतर सलग तीन सेटमध्ये कार्लोस अल्काराज सरस ठरला. हा सामना अल्कारेजने ३-१ ने जिंकला. अल्कारेजने २-६, ६-२, ६-३, ७-५ ने नोवाकला नमवले. कार्लोसने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन किताब जिंकला आणि कॅरियर ग्रँड स्लॅम पूर्ण केलं. कार्लोस अल्कारेजचा हा सातवा ग्रँड स्लॅम किताब आहे. अल्कारेजने वयाच्या २२ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबलडन आणि यूएस ओपन किताब जिंकला. त्याने २०२३,२०२४ मध्ये विंबलडन, २०२४,२०२५ मध्ये फ्रेंच ओपन, २०२२ मध्ये यूएस ओपन आणि २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकला. अशी कामगिरी सर्वात लहान वयातील पुरूष टेनिसपटू ठरला. अल्कराजने ८८ वर्षांनंतर डॉन बजचा विक्रम मोडला. कार्लोस अल्कारेजला ऑस्ट्रेलियन ओपन विजयानंतर बक्षिसाच्या रूपाने २.७५ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २५ कोटी २१ लाख रुपये मिळाले. ही ऑस्ट्रेलियन ओपन इतिहासातील सर्वात मोठी बक्षिसी रक्कम आहे. तर नोवाकला उपविजेता म्हणून जवळपास १३ कोटी रुपये मिळाले.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम