WI vs BAN: दुसरा कसोटी सामना ड्रॉ, वेस्ट इंडिजने बांगलादेशला कसोटी मालिकेत 1-0 ने दिली मात

वेस्ट इंडिजने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशला 1-0 ने पराभूत केलं. दुसरा कसोटी सामना ड्रॉ होताच ही मालिका वेस्ट इंडिजने खिशात घातली. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या..

वेस्ट इंडिज बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत वेस्ट इंडिजने बांगलादेशला 1-0 ने पराभूत केलं. या मालिकेतील पहिला कसोटी सामना मीरपूरमध्ये पार पडला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने बाजी मारली होती. तर सिलहटमधील दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला. यामुळे दोन सामन्यांची कसोटी मालिका वेस्ट इंडिजने 1-0 ने खिशात घातली. दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजने जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय वेस्ट इंडिजच्या पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल. कारण हा सामना ड्रॉ करण्यात वेस्ट इंडिजला यश मिळालं.



काय झालं या सामन्यात?


वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 356 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने सर्व गडी गमवून 386 धावा केल्या. तसेच 30 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढण्याचं वेस्ट इंडिजपुढे आव्हान होतं. पण वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावातही चमकदार कामगिरी करत 6 विकेट गमवून 398 धावा केल्या. यासह दुसऱ्या डावात बांगलादेशसमोर विजयासाठी 368 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठण्यासाठी बांगलादेशकडे फार वेळ नव्हता. पाचव्या दिवसअखेर बांगलादेशने 4 गडी गमवून 184 धावा केल्या. त्यामुळे हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला.



काय म्हणाला वेस्ट इंडिजचा कर्णधार?


वेस्ट इंडिजचा कर्णधार रॉस्टन चेस म्हणाला की, 'साहजिकच, आम्ही इथे दोन कसोटी सामने जिंकण्याच्या उद्देशाने आलो होतो. आम्हाला ते जमले नाही, पण आम्ही हे यश स्वीकारू. मला वाटले की आमच्याकडे पुरेसा वेळ होता, पण आजच्या दोन फलंदाजांनी, विशेषतः, चांगली फलंदाजी केली. खेळपट्टी थोडी सोपी होती, आणि आम्हाला वाटले की जर आज सकाळी आम्हाला आणखी एक विकेट मिळाली असती, तर परिस्थिती आणखी बिकट झाली असती, पण आमच्या अपेक्षेप्रमाणे ते घडले नाही. पण मला वाटले की आमच्याकडे पुरेसा वेळ होता. आम्हाला फक्त असे वाटले की कदाचित आम्ही आघाडी गमावली. जर आमच्याकडे ती आघाडी असती, तर साहजिकच आम्हाला फलंदाजीला इतका वेळ द्यावा लागला नसता. त्यामुळे मला वाटते की सामना आमच्या हातून थोडा निसटला.ट

Comments
Add Comment

सँडपेपरगेट प्रकरणी अखेर डेविड वॉर्नरने मौन सोडले, उस्मान ख्वाजा काय म्हणाला? त्यावर केलं भाष्य

क्रिकेटविश्वात 2018 मध्ये सँडपेपरगेट प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ

रोहित शर्मा रचणार इतिहास! षटकारांचा असा महाविक्रम जो कधीही कोणाला मोडता येणार नाही?

भारतीय क्रिकेट संघाचा धडाडीचा फलंदाज आणि 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटच्या

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ! दिग्गज फलंदाज मार्नस लॅबुशेन थेट संघातून बाहेर; निवड समितीचा मोठा निर्णय

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया): आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत असून, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज

Josh Tongue : इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून ऐनवेळी बाहेर; क्रिकेट विश्वात खळबळ

इंग्लंड क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अगदी तोंडावर मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा प्रतिभावान वेगवान

अखेर तो प्रयोग फसला! तरीही सुनील गावस्कर म्हणतात, 'यात काहीही चुकीचे नव्हते...'

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अत्यंत

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून हार्दिक पांड्या बाहेर; पुनरागमन लांबणीवर!

आगामी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा स्टार