मनसेच्या अनेक उमेदवारांचा उबाठामुळे पराभव?

राज ठाकरेंसमोर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून 'उबाठा'बाबत तक्रारींचा पाढा


मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसेच्या अंतर्गत असंतोषाला उघडपणे वाट मोकळी करून देणारी महत्त्वाची बैठक सोमवारी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पार पडली. या बैठकीत पराभूत उमेदवार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर ‘उबाठा’ गटाबाबतच्या तक्रारी मांडत, अपेक्षित सहकार्य न मिळाल्याचा आरोप केला.


बैठकीत उपस्थित उमेदवारांनी सांगितले की, मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये उबाठा गटाची मते मनसेकडे वळली नाहीत. निवडणुकीदरम्यान उबाठा गटाने प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय सहभाग न घेतल्यामुळे मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा दावा करण्यात आला. अनेक मतदारसंघांमध्ये मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून, थोड्या फरकाने विजय हुकल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर राज ठाकरे यांनी उमेदवारांनाच सवाल करत, युती असली तरी स्थानिक पातळीवर तुमची स्वतःची तयारी किती होती, असा थेट प्रश्न उपस्थित केला. केवळ युतीवर अवलंबून राहून निवडणूक जिंकता येत नाही, असेही ते म्हणाल्याचे समजते.


बैठकीत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही आपली भूमिका मांडली. जागावाटपाच्या वेळी मनसेला ताकदीचे वॉर्ड मिळाले नसल्याचा परिणाम निकालांवर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या वॉर्डांमध्ये मनसेची पकड भक्कम होती, त्या वॉर्डांऐवजी तुलनेने कमजोर मतदारसंघ देण्यात आल्यामुळे उमेदवारांना मोठा संघर्ष करावा लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


माध्यमांशी बोलणे टाळले : बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. मात्र, मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार नाही, एवढे स्पष्ट करत ते निघून गेले. तर, मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही बैठक पूर्णतः अंतर्गत असल्याचे सांगितले. बैठकीतील चर्चेचा तपशील कॅमेऱ्यासमोर सांगता येणार नाही, असे म्हणत त्यांनी उबाठा गटाबाबत प्रतिक्रिया देणे टाळले.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर