Islamabad Blast: मशिदीत नमाज सुरु असताना स्फोट, १२ ठार; इस्लामाबादमध्ये आणीबाणी घोषित

इस्लामाबाद: पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमधील एका इमामबारगाहमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामाबादमधील एका शिया मशिदीत हा आत्मघातकी हल्ला झाला आहे. आत्मघातकी हल्लेखोराने आत प्रवेश केल्यानंतर गेटजवळ स्वतःला उडवून दिले. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि चार जण जखमी झाले आहेत. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचे वृत्त मिळताच पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि प्राथमिक बचाव कार्य सुरू झाले आहे.


स्फोटानंतर, इस्लामाबादमधील पॉलीक्लिनिक, पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) आणि सीडीए हॉस्पिटलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार; पिआयएमएसच्या कार्यकारी संचालक (ईडी) यांच्या सूचनेनुसार रुग्णालयात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.


त्यांनी पुढे सांगितले की, मुख्य आपत्कालीन, ऑर्थोपेडिक, बर्न सेंटर आणि न्यूरोलॉजी विभाग सक्रिय करण्यात आले आहेत. जखमींना पिआयएमएस आणि पॉलीक्लिनिकमध्ये दाखल करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Yemen Attack : मध्यपूर्वेत युद्धाचा भडका? येमेनमधील राजवाड्यावरील हल्ल्याने खळबळ

सना : मध्यपूर्वेतील भू-राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा तीव्र उधाण आले असून, येमेनमध्ये हुती बंडखोरांनी थेट

रशियात शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा धोका आहे का, किती नुकसान झाले?

मॉस्को : रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्प परिसरात शुक्रवारी भूकंपाचे अत्यंत तीव्र धक्के जाणवले.

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि