कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि लैंगिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचे सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीमिंग) केले जात होते. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी तो रोबोट आणि दोन तरुणांचे मोबाईल फोन जप्त केले असून, रोबोटचा वापर जाणीवपूर्वक छळ करण्यासाठी करण्यात आला होता का, याचा तपास सुरू केला आहे.
रेस्टॉरंटबाहेर घडला प्रकार
ही घटना रविवारी रात्री ११:४५ वाजताच्या सुमारास कोलोन शहरातील 'होहेनझोलर्नरिंग' या गजबजलेल्या भागात घडली. १६ वर्षांची तरुणी तिच्या मित्रांसोबत एका फास्ट-फूड रेस्टॉरंटबाहेर उभी होती. त्याच वेळी लाल आणि सोनेरी रंगाचा, साधारण ४ फूट (१.२ मीटर) उंच असलेला रोबोट मागून तिच्याजवळ आला आणि त्याने तरुणीला अयोग्यरीत्या स्पर्श करत विकृत हालचाली करण्यास सुरुवात केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या २६५ वरून ३०५ मुंबई : दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हातात ...
सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग
मिळालेल्या माहितीनुसार, रोबोटच्या या कृत्याचे सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होते. या रोबोटचा १६ वर्षांचा मालक आणि त्याचा १९ वर्षांचा मित्र हे दोघेही तिथेच उपस्थित होते. रोबोट तरुणीचा छळ करत असताना हे दोघे त्याचा व्हिडिओ बनवत होते आणि त्यावर कमेंट्री करत होते, असा पोलिसांना संशय आहे.
गाडीच्या डिकीत लपवला होता रोबोट
घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपींच्या व्हॉल्क्सवॅगन (Volkswagen) कारची पाहणी केली असता, गाडीच्या डिकीत तो रोबोट लपवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ रोबोटसह आरोपींचे दोन्ही मोबाईल जप्त केले. पोलिसांनी या प्रकरणी 'लैंगिक छळ' या गुन्ह्यांतर्गत तपास सुरू केला आहे.
रोबोटच्या हालचालींचा फॉरेन्सिक तपास
रोबोटच्या हालचाली ऑटोमॅटिक (आपोआप) सुरू होत्या की त्याला रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित केले जात होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, जप्त केलेल्या मोबाईल फोनच्या मदतीने या घटनेचे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग कसे केले गेले आणि यात कोणाचा सहभाग होता, याचे पुरावे पोलीस गोळा करत आहेत.