Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदाचा उमेदवार आज ठरणार!

महापौर आणि उपमहापौरपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईचा महापौर कोण याबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे . त्यामुळे अखेर महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा भाजप आणि शिवसेनेकडून शनिवारी होणार आहे. शनिवारी महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे. त्यामुळे भाजप शिवसेना सोबतच विरोधी पक्षाच्यावतीने उबाठासह काँग्रेस पक्षाच्यावतीनेही उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.


मुंबईच्या महापौर पदासाठी महिला सर्वसाधारण गटाचे आरक्षण पडल्यापासून महापौर पदासाठी भाजपच्यावतीने जुन्या महिलांपैंकी राजेश्री शिरवडकर, अलका केरकर, रितू तावडे, शीतल गंभीर, योगिता कोळी, हर्षिता नार्वेकर तसेच प्रिती सातम यांची नावे चर्चेत आहेत. त्यातून सर्व चर्चेतील नावे मागे पडून राजेश्री शिरवडकर, रितू तावडे आणि शीतल गंभीर यांची नावे माध्यमांमध्ये चर्चेत आहेत.


मात्र, महापौरपदासाठी भाजपच्या मुंबई अध्यक्षांकडून शिफारस करण्यात आलेल्या यापैंकी काही नावांच्या प्रस्तावांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबईची कोअर कमिटी साधक बाधक चर्चा करून सभागृह चालवण्यासह वक्तृत्व आणि आक्रमकता तसेच अभ्यासूवृत्ती आणि हजरजबाबीपणा आदींचा विचार करून यातील एक नाव निश्चित करणार आहे. त्यामुळे यासर्व निकषांमध्ये कोण बसतो आणि कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो यावर शुक्रवारी रात्रीपर्यंत निर्णय होऊ शकतो. त्यामुळे शनिवारी गुलदस्त्यातील हे नाव जाहीर होऊन ते आपला उमेदवारी अर्ज महापालिका सचिव मंजिरी देशपांडे यांच्याकडे सादर करतील . महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सकाळी १० ते सायंकाळी ०६ एवढी वेळ आहे .


महायुतीतील मोठा पक्ष असल्याने महापौरपदासाठी भाजपकडून तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून उमेदवार दिले जाणार आहे. तर विरोधी पक्षाच्यावतीने उबाठाकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपल्या पक्षाच्यावतीने उमेदवार दिला जाणार आहे. उबाठाच्यावतीने उर्मिला पांचाळ, प्रविणा मोरजकर, चित्रा सांगळे, सोनम जामसूतकर. रोहिणी कांबळे यांची महापौर आणि उपमहापौरपदासाठी नावे चर्चेत आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने