Jaykumar Gore: जयकुमार गोरेंच्या आरोपामुळे राजकीय वातावरणात खळबळ, जिल्हा परिषद जिंकणाऱ्या भाजपच्या माजी आमदाराच्या हत्येचा कट...

सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीनंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच आता ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गंभीर आरोप केला आहे. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, असाही आरोप गोरे यांनी केला आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.


पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, "माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता. जे मला गुंड म्हणत आहेत, ते सर्वात मोठे गुंड आहेत. माळशिरसमध्ये बघा कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे. अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली. ज्या पद्धतीचे भाजपला मत मिळाली आहे. ते बघून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण आणि दमदाटी झाली. त्याठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यातून त्यांच्या खुनाचा कट होता" असा गंभीर आरोप गोरे यांनी केला.


तसेच, राम सातपुते यांच्यावर कोण हल्ला करणार होते, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. हा कट कोणी रचला होता ते भविष्यात पोलीस तपासात समोर येईल, याबाबत कोण गुंडा आहे. हे समोर येईलच त्यानंतर आपण चर्चा करू' असंही गोरे म्हणाले.


"पराभव झाल्यानंतर कारण सांगण्याची मला सवय नाही. पराभव का झाला याचं विश्लेषण मी करणार नाही. मात्र, झालेला पराभव स्वीकारतो. सोलापूरकडे लक्ष होतं, त्यामुळे साताऱ्याकडे दुर्लक्ष झालं हे खरं आहे. केवळ दुर्लक्ष होणे हे एकमेव पराभवाचे कारण नाही. असे अनेक पराभवाचे धक्के स्वीकारलेले आहेत. या धक्क्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा नेहमी प्रयत्न करतो. राजकारणातून प्रत्येक जण असा पराभव होऊन जातो. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं आहे, पराभव हा अंतिम नसतो आणि विजयी अंतिम नसतो. कामात सातत्य असले पाहिजे' अशी प्रतिक्रियाही गोरेंनी दिली.


'अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे'



"रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात चौकशी झाली पाहिजे, हे मत मांडलं आहे. चौकशी झालीच पाहिजे, असं आमचं मत आहे. त्या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. त्यामुळे त्याबाबतीत अधिकच बोलणं योग्य नाही. चौकशीसाठी कुठली एजन्सी असली पाहिजे. याचा निर्णय सुरक्षा एजन्सी घेतील. सुरक्षा यंत्रणा राज्य आणि केंद्र सरकार ठरवतील' असंही गोरे म्हणाले.



Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण