Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या तीन ते चार घटनांमुळे चर्चेत आला. समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) सिन्नर आणि वावी हद्दीत एकाच रात्री घडलेल्या ‘टायर फोडा आणि लुटा’ या प्रकारानंतर प्रवांशाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. दरम्यान, समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केलाय. या दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह सात संशयित आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून इतर ५ फरार आरोपींचा शोध सुरू आहे. (Nashik Crime News)



नेमकं काय घडलं ?


नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील मलढोण आणि दुशिंगपूर शिवारात गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळक्याने वाहनांच्या मार्गात खिळे आणि धारदार लोखंडी वस्तू टाकून वाहनांचे टायर पंक्चर करुन लुटमारी केली. दीड तास लूटमार केली जात असतानाही महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेला त्याचा थांगपत्ताही न लागल्याने प्रवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. गुरुवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब मोटारीने मुंबईच्या दिशेने निघाले होते. रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी वस्तूंमुळे मोटारीचे टायर फुटले. त्यामुळे मोटार थांबताच दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने संधी साधली. भयभीत झालेल्या मोटारीतील सर्वांनी अंगावरील सोन्याचे दागिने, घड्याळे आणि ८४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटारुंना दिला. या घटनेनेतर अजून एक प्रकार घडला.हातात धारदार हत्यारे घेतलेले पाच ते सहा जण समृध्दी महामार्गावर कठडे ओलांडून मोटारीकडे धावत आले. धोका पाहून व्यावसायिकाने स्वत:कडे असलेल्या परवानाधारक बंदुकीूतने हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे लुटारु पळून गेले. त्यानंतर पाठीमागून आलेल्या वावी पोलिसांनी सर्व माहिती घेतली. (Nashik Crime News)



तपासाची चक्रे फिरली अन्


घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी (D.S. Swami) यांच्या नेतृत्वात तपासासाठी १० विशेष पथके तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, वैद्यकीय दुकाने, हॉटेल्स आणि ग्रामपंचायतींच्या माहितीच्या आधारे तपासाचा धागा पकडला. दरोडेखोरांनी घटनास्थळापासून ५ किलोमीटर अंतरावर आपली वाहने उभी केली होती. यानंतर पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा, पाणगाव, खामकरवाडी आणि उमरा या गावांमध्ये थेट कोंबिंग ऑपरेशन राबवून ७ जणांना ताब्यात घेतले. तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन्ही वाहने जप्त केली आहेत. (Nashik Crime News)



अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे


दरम्यान, अटक (Arrested) करण्यात आलेले सर्व दरोडेखोर हे धाराशिव जिल्ह्यातील असून अर्जुन पवार, अशोक शिंदे (मुख्य सूत्रधार), लखन काळे, धनाजी पवार, नितीन शिंदे आणि गोविंद पवार अशी त्यांची नावे आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण