सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार : कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई : सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून, नियमावलीचा मसूदा तयार झाल्यानंतर कला क्षेत्रातील अभ्यासू व संबंधित घटकांकडून सूचना मागविण्यात येतील. प्राप्त सूचनांचा सकारात्मक विचार करून अंतिम नियमावली तयार केली जाईल, अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली.


कामगार मंत्री श्री. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कामगार संहिता (Labour Code) च्या अनुषंगाने सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.


या बैठकीस कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुन्मोड, उपसचिव रोशनी पाटील, प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, पुनम ढिल्लो यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


सिने क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ व कामगारांच्या सामाजिक सुरक्षा, वेतन, विमा, कामाचे तास, कल्याणकारी योजना तसेच कामगार संहितेतील तरतुदींची अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सिने कलाकारांच्या हितासाठी स्वतंत्र नियमावली तयार करून त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.


कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की, नवीन कामगार संहितेच्या चौकटीत सिने क्षेत्रातील कलाकार व संबंधित कामगारांच्या हितासाठी स्पष्ट व प्रभावी नियमावली तयार करण्यात येईल. त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.


यावेळी Cintaa (सिंटा) सिने एंड टेलीविज़न आर्टिस्ट एसोसिएशन वतीने अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि पुनम ढिल्लो यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, सहाय्यक व विविध विभागांतील कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या.
बैठकीदरम्यान नियमावली संदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर