सिंधुदुर्गात पर्यटनविकासाला चालना; ५ स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी; मंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने ५ स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला गती द्यावी, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.



सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाला गती देण्यासाठी तसेच उच्च दर्जाच्या पर्यटन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, सिस्टुला ट्यूलिप पीएलसीचे अध्यक्ष माइक बेरी, संचालक अमित कामत आदी उपस्थित होते.


राज्याचे पर्यटन मंत्री श्री.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रलंबित बाबींवर सखोल चर्चा करून प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.


या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटनविकास उपक्रमांबाबत सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसंबंधी चर्चा झाली.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म