T20 World Cup 2026 IND vs PAK : भारत-पाक मॅच रद्द झाल्यास सुपर ८ मध्ये कुठली टीम जाणार ?

कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. हा यंदाच्या वर्ल्डकपमधील २७ वा साखळी सामना असेल. क्रिकेटप्रेमींचे लक्ष असलेल्या या हायव्होल्टेज सामन्याआधीच एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.


श्रीलंकेच्या हवामान विभागाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तविली आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे कोलंबोत पावसाची ९३ टक्के शक्यता आहे. सामन्याच्या वेळेत म्हणजेच संध्याकाळी सात पासून पुढे पावसाची शक्यता फक्त नऊ टक्के आहे. पण संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता ४९ टक्के आहे. तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जर सामन्यावेळी किंवा सामन्याआधी पाऊस पडल्यामुळे सामन्याच्या नियोजनावर परिणाम झाला तर हायव्होल्टेज सामन्याची मजा कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.



सामना रद्द झाल्यासं नुकसान कोणाचं?


पावसामुळे ही मॅच रद्द झाल्यास कुठल्या टीमचा फायदा आणि नुकसान होईल? फायद्याबद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही संघांना समान फायदा होईल. कारण दोन्ही टीम्सचे प्रत्येकी ४-४ पॉइंट्स आहेत. मॅच रद्द झाल्यास १-१ पॉइंट दोघांना मिळेल. म्हणजे दोन्ही टीम्सचे ५-५ पॉइंट होतील. दोन्ही टीम्स सुपर-८ मध्ये क्वालिफाय करतील. नुकसानीबद्दल बोलायचं झाल्यास अमेरिका आणि नेदरलँड्स दोन्ही टीम्सचं नुकसान होईल. USA ची सलग दुसऱ्यांदा सुपर ८ मध्ये पोहोचण्याची संधी हुकेल. नेदरलँड्स आणि USA चे २-२ पॉइंट्स आहेत. दोघांचा आता फक्त एक सामना बाकी आहे. दोघांनी आपपले सामने जिंकले तर त्यांचे ४-४ पॉइंट होतील. ते पुरेसे नसतील.



USA सुपर-८ मध्ये पोहोचू शकते का?


भारत-पाकिस्तान सामन्याचा निकाल लागल्यास एक टीम सुपर-८ राऊंडमध्ये पोहोचेल. पण दुसऱ्या टीमला नेदरलँड्स आणि USA शी खेळावं लागेल. नेदरलँड्सचा मार्ग कठीण आहे. कारण त्यांचा शेवटचा सामना भारताशी आहे. तेच USA चा शेवटचा सामना नामीबिया विरुद्ध आहे. १५ फेब्रुवारीला टीम इंडियाने पाकिस्तानला हरवलं आणि नामीबियाने पाकिस्तानला नमवलं आणि USA ने नामीबियाला हरवलं, तर अमेरिकी टीम पुढच्या राऊंडमध्ये पोहोचेल.


भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ यंदाच्या वर्ल्डकपसाठी ए ग्रुप अर्थात अ गटामध्ये आहेत. भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी आणि नामिबियाविरुद्धचा सामना ९३ धावांनी जिंकला आहे. दोन्ही साखळी सामने जिंकल्यामुळे भारत चार गुण आणि +३.०५० च्या नेट रनरेटसह गटात अव्वलस्थानी आहे. पाकिस्तानने नेदरलँड विरुद्धचा सामना ३ विकेट राखून आणि अमेरिकेविरुद्धचा सामना ३२ धावांनी जिंकला आहे. हे दोन्ही साखळी सामने जिंकल्यामुळे पाकिस्तान चार गुण आणि +०.९३२ च्या नेट रनरेटसह गटात दुसऱ्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून