AC Local : पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! १९ फेब्रुवारीपासून धावणार १२ नवीन एसी लोकल; लोकल फेऱ्यांमध्येही वाढ

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी १९ फेब्रुवारीपासून १२ नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एसी लोकलची वाढती मागणी आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. एसी लोकलसोबतच प्रशासनाने ३ नवीन नॉन-एसी (साध्या) लोकल फेऱ्यादेखील वाढवल्या आहेत. या निर्णयामुळे आता पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १४१४ वर पोहोचली आहे. सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासाचे विविध आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देणे, तसेच पीक अवर्समधील गर्दीचे नियोजन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. १९ फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या या नवीन वेळापत्रकामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास आता आणखी गतिमान आणि आरामदायी होणार आहे.



पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवारही धावणार जादा एसी लोकल


पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी आपल्या लोकल सेवेत मोठे बदल केले असून, एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता एसी लोकलची एकूण संख्या १२१ वरून १३३ वर पोहोचली आहे. यामध्ये ११ साध्या लोकलच्या जागी एसी सेवा सुरू करण्यात येणार असून, एक पूर्णपणे नवीन एसी फेरी वाढवण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी धावणाऱ्या एसी लोकलची संख्या आता ७७ वरून थेट १०६ करण्यात आली आहे. यामुळे सुट्टीच्या दिवशी फिरणाऱ्या प्रवाशांना गारेगार प्रवास करता येईल. पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल सेवांची संख्या आता १४१० वरून १४१४ झाली आहे. वांद्रे ते भाईंदर दरम्यान धावणारी लोकल आता थेट विरारपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे विरारच्या प्रवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हे सर्व बदल १९ फेब्रुवारीपासून लागू होणार असून, यामुळे कार्यालयीन वेळेसह सुट्टीच्या दिवशीही प्रवाशांची गर्दी विभागली जाण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म