कुणकेश्वरच्या विकासासाठी कटीबद्ध ; अधिकाधिक निधी देणार -पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद मिळाल्याची भावना


मुंबई : आज महाशिवरात्री निमित्त कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्राचीन व ऐतिहासिक श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिवत दर्शन घेऊन भगवान श्री महादेवांची मनोभावे पूजा केली.


यावेळी बोलताना ते म्हणाले, श्री देव कुणकेश्वराच्या यात्रेला मी गेली अनेक वर्षांपासून नियमित दर्शनासाठी येत असून कुणकेश्वराचे दर्शन माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कुणकेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नसून कोकणाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी शासनाच्या मार्फत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन यावेळी केले. यावेळी कुणकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त, प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


कुणकेश्वर यात्रेसाठी राबविण्यात आलेल्या ‘प्लास्टिक मुक्त यात्रा’ या अभिनव उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला आहे. यात्रेदरम्यान प्लास्टिकचा वापर टाळून स्वच्छ, सुंदर आणि हरित कुणकेश्वर घडवण्याचा संकल्प प्रशासनाने कृतीतून दाखवला. भाविकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करत यात्रा यशस्वी व शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन व प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. पर्यावरण रक्षण आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन यांचा सुंदर समन्वय साधत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये