Mulund Metro Accident: मुलुंड मेट्रो स्लॅबप्रकरणी कार्यकारी अभियंता निलंबित; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली कारवाई

मुंबई: मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे शनिवारी झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.


अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


एमएमआरडीए प्रशासनाकडून दुर्घटनेची माहिती घेतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. या दुर्घटनेची दखल घेत त्यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांचे निलंबनाचे निर्देश दिले. तसेच मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ॲाडिट करण्याचे आदेश शिंदेंनी दिले आहेत.


दरम्यान, या अपघाताला जबाबदार असलेल्या मिलन इंफ्रा कंपनीला पाच कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर दुर्घटनाग्रस्त मेट्रो मार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीला कन्सल्टंट करणाऱ्या लुई बर्गर कंपनीला १ कोटी रुपयाचा दंड भरावा लागणार आहे.


दुर्दैवाने, या घटनेत मुंबई फिरण्यासाठी आलेले उत्तर प्रदेशातील रामधन यादव यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. रामधन यादव हे उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील एका गावाचे सरपंच म्हणून काम पाहत होते. ते मित्रासोबत मुंबई फिरण्यासाठी आले होते. कळव्यात एका लग्नासाठी रामधन यादव आणि महेंद्र यादव रिक्षानं निघाले होते. त्याचवेळी मेट्रोचा सिमेंट ब्लॉक रिक्षावर कोसळला आणि ही दुर्देवी घटना घडली. मुंबई फिरल्यानंतर दोन दिवसात रामधनी यादव उत्तर प्रदेशात जाणार होते. या घटनेची माहिती मिळताच रामधन यादव यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर एकच हंबरडा फोडला.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने