Rahul Gandhi: राहुल गांधींना गोळ्या घालण्याची धमकी; करणी सेनेच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ व्हायरल

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या करणी सेनेच्या एका कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी गुरुवारी (१९ फेब्रुवारी) हा व्हिडिओ 'एक्स' वरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.


जय महाकाल, जय ओम बिर्ला, जय नरेंद्र मोदी. ज्या प्रकारे काँग्रेसच्या २५ खासदारांनी भारताच्या संसदेत घुसून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवीगाळ केली. त्यामुळे भाजपा आणि करणी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे, पुन्हा अशी घटना घडली, तर राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू", अशी धमकी देणारा व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून हा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे.


करणी सेनेच्या नेत्याकडून ही धमकी दिली गेली आहे. व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, "राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून हे केलं गेलं आहे. राहुल गांधींनी नीट ऐकावे, पुन्हा असे घडले तर घरात घुसून गोळ्या घालून मारू आणि याला प्रशासन जबाबदार असेल. २५ खासदारांवर कारवाई झाली पाहिजे. मोदी सरकारचे मंत्री किरण रिजिजू यांच्याकडून जे विधान केले गेले आहे, ते ऐकल्यापासून आम्ही खूप रागात आहोत, जर पुढच्या २४ तासांच्या आत त्या खासदारांना अटक झाली नाही तर प्रत्येकाला आम्ही गोळ्या घालू." अशा धमकी करणी सेनेकडून देण्यात आली आहे.



नेमकं प्रकरण काय?


केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सभागृहातील एक व्हिडिओ शेअर केला. ४ फेब्रुवारी रोजी संसदेत विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यात झालेल्या संघर्षादरम्यान काँग्रेस खासदारांच्या एका मोठ्या गटाने त्यांना शिवीगाळ केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकावले असा आरोप त्यांनी केला. या व्हिडिओमध्ये लोकसभा अध्यक्षांच्या दालनात काँग्रेस पक्षाच्या महिला खासदार दिसत आहेत, जिथे त्या भाजप मंत्र्यांशी वाद घालताना दिसत आहेत.

Comments
Add Comment

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?

Nashik : प्रारूप मतदार यादी जाहीर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

Nashik : नाशिक जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून, यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांनी तसेच दावे-हरकती

Gold Silver Rate Today : PM मोदींचे 'ते' आवाहन अन् सोन्या-चांदीचे भाव गडगडले! चांदी थेट 'इतक्या' हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

मुंबई : परदेशी चलनावरील वाढता दबाव कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत संतुलन राखण्यासाठी पंतप्रधान

Navi Mumbai Crime : अवघ्या ४० रुपयांसाठी थेट जीव घेतला! तरुण रिक्षाचालकाची निर्घृण हत्या

नवी मुंबई : अवघ्या ४० रुपयांच्या रिक्षा भाड्यावरून झालेल्या वादातून १८ वर्षीय रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने

FDA Action Navi Mumbai : नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाकडून ७६ लाखांचा माल जप्त

नवी मुंबई : मुदत संपलेले (Expired) खाद्यपदार्थ फेकून न देता, त्यांच्यावर नवीन तारखा छापून ते बाजारात विकणाऱ्या एका