Ranveer Singh: बॉलिवूडचा धुरंधर गँगस्टर्सच्या निशाण्यावर; लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून १० कोटी रुपयांची मागणी

गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड गँगस्टर्सच्या निशाण्यावर आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर आता रणवीर सिंग लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर आहे.


रणवीरला बिष्णोई गँगकडून तब्बल दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. रणवीरच्या मॅनेजरला एका अमेरिकन मोबाइल नंबरवरून धमकीचा व्हॉइस नोट पाठवण्यात आला होता.


सूत्रांच्या माहितीनुसार, या फोनची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी मुंबई क्राइम ब्रांचने ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार अमेरिकेतील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला आहे. पोलिसांच्या तपासात असंही समोर आलं आहे की, बिष्णोई गँगचा जवळचा साथीदार हॅरी बॉक्सर याने व्हॉइस नोट पाठवून रणवीरला धमकी दिली आणि दहा कोटी रुपयांची मागणी केली. रणवीरच्या मॅनेजरच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या व्हॉइस नोटमधील आवाज हा हॅरी बॉक्सरचाच असल्याची पुष्टी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, यासंदर्भातील इतर ठोस पुरावे गोळा करण्याचं काम क्राइम ब्रांचकडून सुरू आहे.


गेल्या काही दिवसांत बॉलिवूड सेलिब्रिटींना गँगस्टरकडून टारगेट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. बिष्णोई गँगकडून आधी सातत्याने अभिनेता सलमान खानला धमक्या दिल्या जात होत्या. त्याच्याही वांद्रे इथल्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील इतर सेलिब्रिटींवरही निशाणा साधला जातोय.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या