विधिमंडळाची दोन्ही सभागृहे देणार अजितदादांच्या आठवणींना उजाळा

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांत राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. बारामतीचा तो दुर्दैवी विमान अपघात घडला नसता, तर यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी अजित पवार स्वतः उभे राहिले असते; मात्र नियतीच्या फेऱ्यामुळे आता त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याची वेळ सभागृहावर आली आहे.


विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील गोंधळ म्हणजे कामकाज, असा समज रूढ होत असतानाच्या काळात अजित पवार हे संसदीय कामकाजाचे गांभीर्य आणि नियमावलीबाबत अत्यंत आग्रही असत. वैधानिक कामांबाबत असलेली त्यांची आस्था आणि प्रशासनावरील पकड याची उणीव या अधिवेशनात प्रकर्षाने जाणवणार आहे. शोकप्रस्तावावेळी सर्व पक्षांचे गटनेते आपल्या भावना मांडतील, तसेच प्रत्येक पक्षाच्या तीन सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाईल. यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची उपस्थिती असणार असल्याने हा क्षण अत्यंत भावूक ठरणार आहे.



वरळीत शोकसभेचे आयोजन


दरम्यान, सोमवारी सायंकाळी वरळी येथील 'एनएससीआय डोम' येथे भव्य सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. राजकीय मतभेद बाजूला सारून राज्यातील आणि देशातील दिग्गज नेते एकाच मंचावर येऊन अजित दादांना अभिवादन करतील. या शोकसभेला सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंचे नेते उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासह विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांचा समावेश असणार आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने