महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रथमच संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे स्वर

मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रथमच संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे स्वर घुमले. सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी ६ कडव्यांचे आणि ३ मिनिटे १० सेकंदांचे संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. ‘वन्दे मातरम्’ गीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत म्हटले गेले. राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वीही प्रथम ‘वन्दे मातरम्’, त्यानंतर ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले.


‘वन्दे मातरम्’ गीताचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात घेऊन या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रशासनाने सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केले आहे. यासह ‘जन-गण-मन’ पूर्वी ‘वन्दे मातरम्’ गीत म्हणण्याचा नवीन नियम लागू केला आहे, तसेच ‘वन्दे मातरम्’ गीताच्या सन्मानार्थ सर्वांनी उभे रहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रथमच या नियमाची कार्यवाही झाली आहे.

Comments
Add Comment

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :