ब्राझीलमध्ये पावसाचा कहर; आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

ब्राझीलमध्ये निसर्गाचा भीषण कहर पाहायला मिळत आहे. दक्षिण-पूर्व ब्राझीलमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अचानक आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. शेकडो नागरिकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. दक्षिण-पूर्वेकडील मिनास गेरैस राज्यात पुरस्थिती गंभीर झाली आहे.


ब्राझीलच्या दक्षिण भागात मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. हवामान तज्ज्ञांनी पुढील काही दिवसांत या भागात आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मिनास गेरैस राज्यात बचावकार्य वेगाने सुरू असून बचाव पथके परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक घरे आणि वसाहती चिखल व ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या आहेत.


यापूर्वी बुधवारी ब्राझीलच्या अग्निशमन विभागाने सुधारित आकडेवारी जाहीर करत मृतांचा आकडा ४६ झाल्याची माहिती दिली. सुमारे २१ जण अद्याप बेपत्ता आहेत. राज्य अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, जुईज दे फोरा आणि उबा या शहरांमध्ये पूर व भूस्खलनामुळे सुमारे ३,६०० लोक विस्थापित झाले आहेत. ही दोन्ही शहरे सुमारे ११० किलोमीटर अंतरावर आहेत.


मृतांमध्ये ११ वर्षीय बर्नार्डो लोपेस दुत्रा याचाही समावेश आहे. मुसळधार पावसामुळे त्याचे घर कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याची आई आणि बहीण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा यांनी मंगळवारी सांगितले की, बचावकार्यासाठी सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले असून पावसामुळे प्रभावित नागरिकांना तातडीची मदत पुरवली जात आहे. तसेच, डोंगराळ भाग, दऱ्या आणि उतारांजवळील भागात आरोग्य पथकेही पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Nepal Helicopter Crash: नेपाळमध्ये लँडिंगदरम्यान दोन हेलिकॉप्टरची धडक; एक भारतीय ठार

नेपाळच्या सोलुखुम्बु जिल्ह्यातील फेरिचे हेलिपॅडवर उतरताना दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्याने एका भारतीय

Indian ship attacked in Oman sea : ओमानच्या समुद्रात भारतीय मालवाहू जहाजावर हवाई हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू, १३ जण सुखरूप

ओमानच्या किनाऱ्याजवळ एका भारतीय व्यापारी जहाजावर अचानक हवाई हल्ला झाल्याची अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे.

Indian Navy : अरबी समुद्रात भारतीय नौदलाची मोठी बचाव मोहीम; सोमाली चाच्यांच्या तावडीतून 20 खलाशांची सुटका

Indian Navy : अरबी समुद्रात भारतीय नौदलाने मोठी बचाव मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. सोमाली समुद्री चाच्यांनी

Strait of Hormuz : ट्रम्प यांच्या युद्ध टाळण्याच्या दाव्यानंतरही अमेरिकेचा इराणच्या केशम बेटावर हल्ला; गुप्त लष्करी कारवायांची माहिती समोर

International News: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेने इराणच्या

कराची ते ढाका… जनता त्रस्त; दोन देशांत आंदोलनांचा भडका

भारताचे शेजारी देश पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये सोमवारी सामान्य नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरल्याचे

येमेनमध्ये युद्धाचा महाभडका! सौदी आघाडीच्या मिसाईल हल्ल्याने लाल समुद्रात उडाला थरकाप, 7 जण गंभीर जखमी

सना: येमेनमध्ये पुन्हा एकदा संघर्षाचा वणवा भडकला असून लाल समुद्राचा किनारा रक्ताने लाल झाला आहे. हुती