मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, मराठी भाषेला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर तिचे संवर्धन करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे," असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना त्यांनी भाषेच्या संवर्धनासोबतच सध्या सुरू असलेल्या राजकीय वादावरही आपली भूमिका स्पष्ट केली.



भाषेवरून होणारी टीका-टिप्पणी थांबवा


सामंत यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सांगितले की, 'सामना'तून होणाऱ्या टीकेमुळे आम्ही मराठीचा अपमान करतोय असा अर्थ काढणे चुकीचे आहे. भाषेच्या संरक्षणासाठी सकारात्मक चर्चा होणे गरजेचे आहे. जर आपल्याला मराठी भाषेला खऱ्या अर्थाने संरक्षण द्यायचे असेल, तर भाषेबाबतची अनावश्यक टीका-टिप्पणी थांबवावी लागेल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.



VSR कंपनीबाबत स्पष्टीकरण


विमान/हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या VSR कंपनीवरून होत असलेल्या आरोपांवरही उदय सामंत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, "त्या कंपनीबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती किंवा अधिकृत आरोप समोर आलेले नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा प्रवास अत्यंत सुरक्षित आणि निर्धोक व्हावा, हाच आमचा प्राथमिक उद्देश आहे आणि त्याच दृष्टीने काही तांत्रिक मुद्दे मांडण्यात आले आहेत."

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म