Israel - Iran War : तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात ? अतिरेकी संघटना 'हिजबुल्लाह'चा इस्रायलवर रात्रभर हल्ला

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण – इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी इराणवर एकाच वेळी ३० ठिकाणी हल्ले करून युद्धाला सुरुवात केली आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


या परिस्थितीचा परिणाम आता संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. अशातच तिसऱ्या महायुद्धाच्या नांदीला सुरुवात झाली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिरेकी संघटना हिजबुल्लाह यांनी इराण ला पाठिंबा देत इस्रायलवर रात्रभर क्षेपणास्त्र हल्ला केला. सोमवारी मध्यरात्रीपासून इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि आत्मघाती ड्रोन्सचा पाऊस पाडला आहे. या मोठ्या घडामोडीमुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट गडद झाले आहे.


खामेनेईंच्या रक्ताचा बदला घेणार :


लेबनानमधील इराण समर्थक उग्रवादी संघटना 'हिजबुल्लाह'ने अधिकृत निवेदन जारी करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. "अयातुल्ला अली खामेनेई यांच्या पवित्र रक्ताचा बदला घेण्यासाठी आणि इस्रायलच्या अत्याचाराला उत्तर देण्यासाठी आम्ही शेकडो मिसाईल्स आणि ड्रोन्सनी इस्रायलला लक्ष्य केले आहे," असे हिजबुल्लाहने म्हटले आहे. विशेष म्हणजे, गेल्या एक वर्षात पहिल्यांदाच हिजबुल्लाहने अशा प्रकारे मोठ्या हल्ल्याची उघड जबाबदारी स्वीकारली आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.