अर्जुन पुरस्काराचे मानकरी जलतरणपटू वीरधवल खाडे सरकारी नोकरीत

मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे यांच्या क्रीडा क्षेत्रातील देदीप्यमान योगदानाचा आणि प्रशासकीय अनुभवाचा विचार करून राज्य सरकारने त्यांना पुन्हा शासन सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. खाडे यांच्या विनंतीवरून, त्यांनी यापूर्वी दिलेला राजीनामा मागे घेण्यास सरकारने 'विशेष बाब' म्हणून मंजुरी दिली असून नियुक्तीचा शासन आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला.

मूळचे कोल्हापूरचे असलेले विरधवल खाडे यांनी महसूल विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत असताना वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला होता, जो ३० सप्टेंबर २०२४ रोजी स्वीकारण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय सेवेत पुन्हा कार्यरत होण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी अर्जाद्वारे विनंती केली होती. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन सरकारने त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. खाडे यांना तहसीलदार पदावर पुनश्च रुजू करण्यात आले असून, पुढील पदस्थापनेचे आदेश मिळेपर्यंत त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण येथे उपस्थित राहून कामकाज पाहण्याचे निर्देश दिले आहेत.
Comments
Add Comment

PV Sindhu Asian Games 2026 : पी.व्ही. सिंधूचा दमदार विजय; मियाझाकीला मागे टाकत Asian Games 2026 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

PV Sindhu Asian Games 2026 : भारताची स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधूने Asian Games 2026 मध्ये दमदार कामगिरी करत जपानच्या टोमोका मियाझाकीचा सरळ

IND vs WI: पहिल्या वनडेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! प्लेइंग 11 मध्ये होणार मोठे बदल, कारण की...

भारत आणि वेस्ट इंडिया यांच्यातील पहिला वनडे सामना 27 सप्टेंबरला होत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार सराव

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी वृद्धाश्रमात? व्हायरल व्हिडिओमध्ये स्वतःच दिली माहिती, म्हणाला...

भारताचा माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर आणि डावखुरा फलंदाज विनोद कांबळी यांची मैत्री क्रिकेटविश्वात सर्वश्रूत

Asian Games 2026 : इराणला धूळ चारत भारतीय महिला कबड्डी संघाने पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेतून भारतासाठी एक अतिशय अभिमानास्पद आणि सुवर्णमय बातमी समोर आली आहे. भारताच्या

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांचा पराक्रम; भारताच्या खात्यात आणखी एक रौप्य पदक!

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या महिला नेमबाजांनी पुन्हा एकदा तिरंगा फडकवला आहे. महिलांच्या 50

Asian Games 2026 : लक्ष्य सेन पुरुष एकेरीतून बाहेर; भारताच्या बॅडमिंटन मोहिमेला धक्का

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या बॅडमिंटन मोहिमेला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार शटलर