ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यापूर्वी म्हणजे शुक्रवारी भारतीय संघ सराव करत होता. या सरावात शुभमन गिलला दुखापत झाली. नेटमध्ये फलंदाजी करत असताना एक चेंडू त्याच्या कोपऱ्याला जोरात लागला. त्यामुळे शुभमन गिल दुखापतीने कळवळला. त्याला झालेल्या वेदना इतक्या तीव्र होत्या की सिराज त्याच्याजवळ धावत गेला. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली आणि त्याच्या दुखापतीवर बर्फाचा पॅक लावून बसवलं. त्यानंतर शुभमन गिल पुन्हा फलंदाजीला उतरलाच नाही. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. अशा स्थितीत शुभमन गिलच्या गैरहजेरीत यशस्वी जयस्वालचा बॅकअप प्लान आहे. तर ऋतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल आणि नमन धीर हा पर्याय देखील आहे.
भारताचा माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर आणि डावखुरा फलंदाज विनोद कांबळी यांची मैत्री क्रिकेटविश्वात सर्वश्रूत आहे. या दोघांनी शालेय, देशांतर्गत आणि ...
शुभमन गिलच्या गैरहजेरीत उपकर्णधार केएल राहुल संघाची धुरा सांभाळेल. कारण कर्णधाराला काही झालं तर ती जबाबदारी आपसूक उपकर्णधाराच्या खांद्यावर येते. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असेल. त्याला प्रसिद्ध कृष्णाची साथ मिळाले. तर तिसरा वेगवान गोलंदाजीचा पर्याय म्हणून गुरनूर ब्रार किंवा आकिब नबीला संधी मिळू शकते. तर फिरकीची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर असेल.
भारताची संभाव्य प्लेइंग 11: केएल राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.