सीएसकेविरोधात सन टीव्ही नेटवर्कची मद्रास उच्च न्यायालयात धाव

रजनीकांत यांच्या गाण्यांचा आणि संवादांचा अनधिकृत वापर केल्याचा दावा


नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला मैदानाबाहेर एका कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागला आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्या गाण्यांचा आणि संवादांचा अनधिकृत वापर केल्याप्रकरणी सन टीव्ही नेटवर्कने सीएसके विरुद्ध मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत, सीएसकेने संबंधित गाणी वापरणे थांबवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


सन टीव्ही नेटवर्कने असा दावा केला होता की, चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या खेळाडूंच्या इंट्रोडक्शन आणि जर्सी लॉन्चच्या प्रोमो व्हिडीओंमध्ये रजनीकांत यांच्या ‘जेलर’, ‘कूली’ आणि आगामी ‘जेलर २’ या चित्रपटांतील गाणी, पार्श्वसंगीत आणि संवादांचा वापर केला आहे. या सर्व चित्रपटांची निर्मिती ‘सन पिक्चर्स’ने केली असून त्याचे सर्व हक्क सन टीव्ही नेटवर्ककडे राखीव आहेत. कोणतीही पूर्वपरवानगी किंवा परवाना न घेता या संगीताचा वापर केल्याने कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता.


मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सेंथिलकुमार राममूर्ती यांच्यासमोर शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. सन टीव्हीच्या वतीने ज्येष्ठ वकील जे. रवींद्रन यांनी युक्तिवाद केला की, व्यावसायिक फायद्यासाठी या संगीताचा वापर केला जात आहे. याला उत्तर देताना सीएसकेच्या वतीने ज्येष्ठ वकील पी. एस. रमण यांनी सांगितले की, ‘आम्ही गेल्या तीन वर्षांपासून अशी गाणी वापरत आहोत आणि तेव्हा कोणीही हरकत घेतली नव्हती. मात्र, आता आक्षेप घेण्यात आला असल्याने, आम्ही अधिकृत परवाना घेतल्याशिवाय रजनीकांत यांच्या कोणत्याही चित्रपटातील गाणी वापरणार नाही’.


सन टीव्हीने केवळ गाण्यांवर बंदी घालण्याचीच नाही, तर सीएसकेने या व्हिडीओंमधून मिळवलेल्या महसुलाचा तपशील सादर करण्याची आणि १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणीही केली आहे. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ मार्च रोजी ठेवली असून, तोपर्यंत सीएसकेला त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून