संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन


मुंबई : मुंबईकरांच्या बालपणीच्या आठवणींशी घट्ट नाते असलेली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वनराणी’ मिनी ट्रेन अखेर नव्या रूपात रुळावर परतली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या हस्ते शनिवारी या ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. २०२१ मधील ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेली ही सेवा तब्बल सहा वर्षांनंतर अधिक आधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानासह पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.
या सोहळ्याला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईच्या प्रगतीचा आणि निसर्ग संवर्धनाचा संकल्प बोलून दाखवला. ऊर्जा-कार्यक्षम आणि बॅटरीवर आधारित इंजिन, आधुनिक कोचेस आणि मार्गिकेलगतच्या सौंदर्यीकरणामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता दोन प्रकारच्या ट्रेन धावणार आहेत. यामध्ये आधुनिक सुविधेची 'व्हिस्टाडोम मिनी ट्रेन' आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारी 'वनराणी विंटेज ट्रेन' यांचा समावेश आहे. या दोन्ही ट्रेन बॅटरीवर चालणाऱ्या असल्याने उद्यानातील शांतता आणि प्रदूषणाची पातळी राखण्यास मदत होईल. निसर्गरम्य वातावरण आणि जैवविविधतेचा अनुभव पर्यटकांना आता अधिक जवळून घेता येणार आहे.



तौक्ते चक्रीवादळाचा बसला होता फटका :


मे २०२१ मध्ये आलेल्या 'तौक्ते' चक्रीवादळामुळे राष्ट्रीय उद्यानातील रेल्वे मार्गाचे आणि मिनी ट्रेनच्या इंजिनाचे अतोनात नुकसान झाले होते. परिणामी, ही लोकप्रिय सेवा बंद पडली होती. मुंबईकरांनी या ट्रेनच्या पुनरागमनासाठी मोठी प्रतीक्षा केली होती. आता या नव्या सुविधेमुळे शालेय सहली, निसर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म