Salman khan : बॉलीवूडच्या भाईजाननं अचानक बदललं आपल्या आगामी चित्रपटाचं नाव; सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत दिला 'हा' सामाजिक संदेश
March 16, 2026 04:34 PM
बॉलीवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमानने आपल्या आगामी चित्रपटाचं नाव बदलण्याची घोषणा केली आहे. नुकताच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली. त्यानुसार आता "बॅटल ऑफ गलवान" या चित्रपटाचं नाव बदलून 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' असं करण्यात आलं आहे.
इराण इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सगळे एका भीतीच्या वातावरणात आहेत, त्यामुळे त्यांचं मन वळवण्यासाठी, त्यांच्या मनोरंजनासाठी सलमान खानाने आपल्या चित्रपटातून युद्ध हा शब्द जाणीवपूर्वक वगळला आहे.
सलमानने सध्या सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शांततेचा संदेश दिला असून सगळ्यांना संयम राखण्यास सांगितला आहे. सलमानच्या या पोस्टला फॅन्सकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सलमानची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
या चित्रपटातील मातृभूमी हे गाणं नुकताच रिलीज झालं असून अरिजीत सिंहने हे गाणे गायले आहे. तसेच, या गाण्याच्या नावावरूनच चित्रपटाचं टायटल ठेवण्यात आलं आहे. सलमानच्या मातृभूमी या आगामी चित्रपटात सलमान खानसोबत चित्रांगदा सिंह ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहे.