Navi Mumbai: शिक्षिकेचं भयंकर कृत्य; दोन विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेवर तीन विद्यार्थ्यांवर मोबाईल चोरीचा खोटा आरोप करत त्यांच्या पालकांकडून पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे दोन निष्पाप विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला असून, त्यापैकी एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेने शाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर मोबाईल चोरीचा आरोप केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना वारंवार मानसिक दबावाखाली ठेवत त्यांच्या आईकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर “पैसे दिले नाहीत तर मुलांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही,” अशी धमकीही देण्यात आल्याचे समोर आले आहे. या सततच्या दबावामुळे आणि भीतीमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला.



२ विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल



या मानसिक तणावातून दोन विद्यार्थ्यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पालक, नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण, धमक्या आणि अन्यायकारक वागणूक यामुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे हे भीषण उदाहरण मानले जात आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षिकेवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच शाळा प्रशासनाचीही सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment

BMC : पवई तलाव चक्क ३२ टक्के गाळाने भरला; पाणलोट क्षेत्रात पाण्याचे प्रमाण झाले कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील गाळाचे आतापर्यंत ११ ते १२ टक्के असतानाच

BMC : महापालिका निवडणुकीच्या जाहिरातबाजीवर १२.७८ लाखांचा खर्च; छपाई पेक्षा बॅनर लावणे आणि काढण्यावरच अधिकच खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या जनजागृतीसाठी लावलेल्या

BMC News : विद्याविहार रेल्वे पुलाचा खर्च वाढला १० कोटींनी; इमारती वाचवण्यासाठी पुलाचा रस्ता मार्ग बदल्याने वाढला खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विद्याविहार रेल्वे स्थानकावरील एल.बी.एस. मार्ग व आर.सी. मार्ग यांना जोडणाऱ्या उड्‌डाण

BMC News : पाच वर्षांतच गारोडिया नगरमधील पाच रस्त्यांचा पुन्हा विकास; तब्बल साडेचार कोटी रुपये केले जाणार खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील घाटकोपर (पूर्व) मधील गारोडिया नगर वसाहतील खासगी रस्त्यांचा विकास पाच

BMC : महापालिका तथा ग्रीन बाँड्सच्या हालचाली जोरात; बाँड्स जारी करण्यासाठी सल्लागार नियुक्तीकरता महापालिकेची निविदा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका ग्रीन बाँडस् सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, क्षार निर्मूलन प्रकल्प

मध्य रेल्वेचा कसारा येथे मेगाब्लॉक; 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेवर आसनगाव - कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प आणि कसारा यार्डमधील 'अप' यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या