मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार पद्धती आणि सातत्यपूर्ण रुग्ण सहाय्य व पाठपुरावा करण्यात येतो. परिणामी, औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे रुग्ण बरे होण्याचा दर गेल्या ८ वर्षात दुप्पट होऊन ८१ टक्क्यांपर्यंत पोहचला असल्याचा दावा महापालिका आरोग्य विभागाने केला आहे. जागतिक क्षयरोग दिन २४ मार्च रोजी असून विविध आरोग्य संस्थांमध्ये वर्ष २०२५ मध्ये मुंबईत एकूण ५४ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची संख्या नोंदवली गेली. पैकी ४८ हजार ८३५ रुग्ण मुंबईचे रहिवासी होते. यापैकी ४० टक्के रुग्ण एक्स्ट्रा पल्मनरी, ६ टक्के बालरुग्ण आणि ८ टक्के औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे प्रकारातील होते,असे आरोग्य विभागाने नमुद केले आहे.


राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने २०२५ मध्ये “क्षयरोग (TB) मुक्त भारत अभियान” सुरू केले. या कार्यक्रम अंतर्गत १३ लाख ८ हजार २०० संवेदनशील लोकसंख्येची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ लाख २४ हजार ७७४ संशयित रुग्णांचे एक्स-रे करण्यात आले.


मुंबईतील आरोग्य संस्थांच्या ठिकाणी ४५ आणि ३४ पोर्टेबल मशीन उपलब्ध आहेत. या संयंत्राद्वारे क्षयरोग व रीफॅम्पीसीन औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचे मोफत व अचूक निदान केले जाते. तसेच आता केंद्रीय क्षयरोग विभागाकडून ४ पॅथोडिटेक्ट मशीनही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संयंत्राद्वारे क्षयरोग तसेच रीफॅम्पीसीन व आयसोनाझेड औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचेही निदान करणे होईल. सध्या २ पॅथोडिटेक्ट संयंत्रे सर जे. जे. रूग्णालय व आयआरएल जीटीबी प्रयोगशाळेत उपलब्ध झाली आहेत. वर्ष २०२५ मध्ये एकूण २ लाख मॉलीक्यूलर चाचण्या करण्यात आल्या.


उच्च जोखीम घटक ओळखून योग्य उपचारासाठी ही सेवा दिली जाते. या सेवेअंतर्गत १९,१७२ रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. मुंबईत ३१ डिआर टीबी क्लिनिकमधून मोफत उपचार व औषध दुष्परिणाम व्यवस्थापन सेवा दिली जाते. ६ महिन्यांची प्रगत उपचार पद्धती सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत १०९३ रुग्णांवर उपचार सुरू झाले असून ८९ रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत.



पौष्टिक आहार किट


निक्षय मित्रांच्या माध्यमातून दरमहा टीबी रुग्णांना सहा महिन्यांकरिता पौष्टिक आहार किट देण्यात येते. मागील २ वर्षांत निक्षय पोषण योजने अंतर्गत एकूण १,४८,८६७ रेशन किट वितरित करण्यात आले.



क्षयरोगाची १० लक्षणे


दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला,ताप,वजन घटणे,रात्री घाम येणे,भूक न लागणे,छातीत दुखणे,श्वास घेण्यास त्रास,रक्त किंवा कफ खोकल्यातून येणे,थकवा,मानेला सूजवरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नये. नागरिकांनी जवळच्या बीएमसी दवाखाना, हेल्थ पोस्ट किंवा “आपला दवाखाना” येथे जाऊन मोफत तपासणी व उपचार करून घ्यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.


 

 
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर