कमला मिलमध्ये महापालिकेची न भूतो, न भविष्यती कारवाई; डॉ अश्विनी जोशी यांनी अशक्य गोष्ट केली शक्य

मुंबई: मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी चाबूक हाती घेताच याच्या महसूल वाढीला आता गती येत आहे. त्या माध्यमातून महानगरपालिकेने अटकावणी व जप्तीची कारवाई अधिक तीव्र करण्याच्या अनुषंगाने कर निर्धारण व संकलन विभाग तसेच जी दक्षिण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कमला मिल परिसरातील रमेश घमंडीराम गोवानी व गौरव इन्व्हेस्टमेंट यांच्या मालकीच्या सात गाळ्यांसह कार्यालय, वाहनतळ, इंटरनेट सेंटर, टाटा पॉवर उप केंद्रावर गुरुवारी २६ मार्च २०२६ रोजी जप्तीची कारवाई केली. यासोबतच संबंधित मालमत्तांचा पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. कमला मिलमधील या कंपन्यांविरोधात जाण्याची हिंमत कोणत्याही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखवली नव्हती, ही हिंमत आता डॉ अश्विनी जोशी यांनी दाखवत अशक्यही गोष्ट शक्य करून दाखवली आहे.


अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचे मार्गदर्शन आणि सहआयुक्‍त ( कर निर्धारण व संकलन) विश्‍वास शंकरवार, सहायक आयुक्‍त ( कर निर्धारण व संकलन) गजानन बेल्‍लाळे यांच्‍या नेतृत्‍वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सन २०२५ - २६ या आर्थिक वर्षाचा तसेच थकीत मालमत्ता कर ३१ मार्च २०२६ पूर्वी न जमा केल्यास संबंधित मालमत्ताधारकांविरोधात दंडात्‍मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच, थकीत करभरणा न करणाऱ्या मालमत्तांवर अटकावणी आणि जप्तीची कारवाई करण्‍यात येत आहे.


कमला मिल परिसरातील रमेश गोवानी व मेसर्स गौरव इन्व्हेस्टमेंट यांच्‍याकडे मालमत्‍ता करापोटी १४ कोटी २२ लाख रूपयांची थकबाकी आहे. तसेच, ६७ लाख २५ हजार ७३१ रूपयांचीही थकबाकी आहे. दिलेलया मुदतीत मालमत्‍ता कर भरणा न केल्‍यामुळे टाटा पॉवर उपकेंद्र, इंटरनेट सेंटर, मोकळे वाहनतळासह सात गाळे आणि गोवानी यांच्‍या मालकीच्‍या कार्यालयावर गुरुवारी जप्तीची कारवाई करण्यात आली. यासोबतच संबंधित मालमत्तांचा पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.


अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, मालमत्ताधारकांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत कर भरणा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे, थकबाकी असलेल्या सर्व मालमत्ताधारकांनी तसेच चालू आर्थिक वर्षाचा करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी करभरणा करून दंडात्मक कारवाई टाळावी. मालमत्ताधारकांना विहित वेळेत मालमत्ता करभरणा करता यावा, यासाठी सार्वजनिक सुटी व साप्ताहिक सुटीच्या दिवशी म्हणजे २६, २८ व २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत तसेच ३० आणि ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र (सीएफसी) सुरू ठेवण्‍यात आली आहेत, असेही डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.