Bhoot Bangla : धुरंधर २ सिनेमामुळे अक्षयचा 'भूत बंगला' पुन्हा लांबणीवर जाणार ?

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. अक्षय कुमारचा भूत बंगला या सिनेमाचं शूटींग पूर्ण झालं आहे. लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे.


अक्षयचा भूत बंगला सिनेमा येत्या १० एप्रिल २०२६ रोजी रिलीज होणार असल्याचं निश्चित झालं होतं. पण, आता हा सिनेमा आणखीन लांबणीवर गेला असल्याच्या चर्चा होत आहेत.


अभिनेता अक्षय कुमारनं ९ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या वाढदिवशी या सिनेमाची घोषणा केली. तेव्हापासून प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण, आता सलग तिसऱ्यांदा या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली असल्याच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत.


सध्या संर्पूण जगभरात रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमानं धूमाकूळ घातलाय. त्यामुळे रणवीरच्या धुरंधर २ सिनेमामुळे अक्षयनं आपल्या भूत बंगला सिनेमाची रिलीज डेट बदलली असल्याचं म्हटलं जातं आहे.


भूत बंगला सिनेमात अक्षय कुमार बरोबरच वामिका गब्बी,स परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत.


आता अक्षयचा हा सिनेमा १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, अक्षयचा भूत बंगला सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या