Iran-US-Israel War : अमेरिकन सैन्य दोन ते तीन आठवड्यांत इराणमधून माघार घेतील - ट्रम्प

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाबाबत (Iran-US-Israel War) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मंगळवारी (३१ मार्च) मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्य इराणमधील आपले लष्करी अभियान लवकरच संपवणार आहे. यासाठी त्यांनी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी सांगितला. या काळात इराणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू राहील, मात्र हवाई हल्ले थांबणार नाहीत.


व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमादरम्यान २८ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या (Iran-US-Israel War) युद्धानंतर इंधनाच्या वाढत्या किंमतींच्या परिणामाबाबत विचारले असता ट्रम्प म्हणाले, “मला फक्त इराणमधून बाहेर पडायचे आहे आणि आम्ही ते लवकरच करू. त्यानंतर किंमती मोठ्या प्रमाणात खाली येतील.” ते पुढे म्हणाले, “आमचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. कदाचित दोन आठवड्यांत किंवा त्याहून थोड्या कालावधीत लष्करी कारवाई संपवून सैन्याला परत बोलावले जाईल.”


ट्रम्प यांनी स्पष्ट केले की अमेरिकन लष्करी अभियान संपणे हे इराणसोबत कोणत्याही करारावर अवलंबून नाही. दरम्यान, प्रत्युत्तरादाखल इराणने तेल टँकरांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ (होर्मुज सामुद्रधुनी) (Iran-US-Israel War) मार्गावरील हालचाल जवळपास बंद केली आहे.ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सर्व देशांना आवाहन केले की त्यांनी स्वतः ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ मार्गे जाऊन आपले तेल मिळवावे. अनेक सहयोगी देशांनी तेल टँकरांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अमेरिकेच्या लष्करी मदतीच्या आवाहनाला नकार दिल्यानंतर त्यांनी हे विधान केले. “फ्रान्स किंवा इतर कोणत्याही देशाला तेल किंवा गॅस घ्यायचा असेल, तर त्यांनी होर्मुज सामुद्रधुनीतून जावे. त्या दरम्यान काहीही घडले, तरी त्याचा अमेरिकेशी संबंध नसेल,” असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.


अमेरिकन सैन्य (Iran-US-Israel War) कारवाईनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून अमेरिकन कंपन्यांना असलेल्या संभाव्य धोक्याबाबतही भाष्य केले. त्यांनी सांगितले की पश्चिम आशियात कार्यरत अमेरिकन कंपन्यांना इराणकडून कोणताही मोठा धोका नाही. त्यांनी प्रश्न उपस्थित करत विचारले की, “इराणने खरंच हल्ला करण्याची किंवा कंपन्या उडवून देण्याची धमकी दिली आहे का?” ट्रम्प म्हणाले की इराण असे कोणतेही पाऊल उचलणार नाही आणि अमेरिकन कंपन्यांवर हल्ला करणार नाही.


त्यांनी पुढे सांगितले की इराण अण्वस्त्रांचा वापर करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे अशा प्रकारची शस्त्रेच नाहीत. ट्रम्प यांनी दावा केला की इराणमधील बहुतेक जुने नेते आता सत्तेत नाहीत, त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत धोका कमी झाला आहे. त्यांच्या मते सध्याची परिस्थिती अधिक नियंत्रणात असून चिंतेचे कारण कमी आहे.


ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की इराणसोबत (Iran-US-Israel War) करार करणे अनिवार्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार इराणमध्ये आता नवे शासन असून ते पूर्वीपेक्षा चर्चेसाठी अधिक तयार आणि सहकार्यशील आहे. अमेरिकेचे उद्दिष्ट केवळ इतकेच आहे की इराणने दीर्घकाळ अण्वस्त्रे तयार करू नयेत. हे उद्दिष्ट साध्य झाले तर करार झाला किंवा नाही, याची पर्वा न करता अमेरिका तेथून माघार घेईल. मात्र त्यांनी असेही सांगितले की इराण स्वतः करार करू इच्छित आहे आणि कदाचित करार होण्याची शक्यता आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की पुढील अनेक वर्षे इराण अण्वस्त्रे तयार करू शकणार नाही. तसेच त्यांनी इशारा दिला की भविष्यात इराणने पुन्हा अण्वस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका पुन्हा कठोर कारवाई करेल. ट्रम्प यांनी इराणच्या पूर्वीच्या नेतृत्वाला कट्टर आणि धोकादायक म्हटले, मात्र सध्याचे नेतृत्व तुलनेने अधिक संतुलित आणि कमी कट्टर असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान, अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी पत्रकार परिषदेत हाच संदेश पुन्हा दिला. ते म्हणाले, “पुढे जाऊन ही फक्त आमची समस्या राहणार नाही. होर्मुज सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की युद्धाचे पुढील काही दिवस निर्णायक ठरणार असून या संघर्षात अमेरिकन स्थलसेनेची भूमिका असण्याची शक्यता त्यांनी नाकारली.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.