Iran-US-Israel War : इराण-अमेरिका तणाव शिगेला; हार्मुज सामुद्रधुनीवर अमेरिकेचा मोठा निर्णय

- ‘ऑपरेशन एपिक फ्यूरी’ सुरूच राहणार : डोनाल्ड ट्रम्प


इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेला युद्धसंघर्ष सुमारे ३३ दिवसांपासून तीव्र होत असून त्याचे परिणाम संपूर्ण जगावर जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठी घोषणा करत हार्मुज सामुद्रधुनीतून तेलपुरवठा थांबवला जाईल, असा इशारा दिला आहे. तसेच अमेरिकेला धमकी देणाऱ्यांना संपवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा कडक शब्दांत त्यांनी इशारा दिला. अमेरिका आपले मिशन पूर्ण करण्याच्या मार्गावर असून युद्ध लवकरच संपेल, असा दावाही त्यांनी केला. तसेच वेनेझुएलासोबत सहकार्य वाढवून आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


काही देशांनी या युद्धात साथ दिली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, अमेरिका तेल आणि गॅस उत्पादनात जगात अग्रस्थानी असल्याने कोणतीही कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.


डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळी ६.३० वाजता आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑपरेशन फ्यूरीबाबत मोठ्या घोषणा केल्या.



‘ऑपरेशन एपिक फ्यूरी’ सुरूच राहणार :


डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन एपिक फ्यूरी’ सुरूच राहणार असल्याचे सांगत इराणसोबत कोणताही करार करणार नसल्याचे स्पष्ट केले. हार्मुज सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी अमेरिका थेट हस्तक्षेप करेल आणि युद्ध संपल्यानंतर ती पुन्हा सुरू केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. पुढील दोन ते तीन आठवड्यांत अधिक कठोर भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिला. याशिवाय, इराणची ड्रोन आणि क्षेपणास्त्र क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट केल्याचा दावा करत, इराणला कधीही अण्वस्त्र तयार करू देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. इराणवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचा दावा करत त्यांनी इराणचे नौदल आणि प्रमुख नेते संपवण्यात आल्याचेही म्हटले. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी हे ऑपरेशन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या या संघर्षाने जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या या युद्धाचे स्वरूप अधिक भीषण झाले असून जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि