Iran-US-Israel War : इराणवर आणखी कठोर हल्ले केले जातील - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की अमेरिका आपल्या रणनीतिक उद्दिष्टांच्या अत्यंत जवळ पोहोचला असून हे युद्ध लवकरच समाप्त केले जाईल. तसेच, कोणत्याही परिस्थितीत आपल्या सहयोगी देशांना नुकसान होऊ दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


राष्ट्राला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त मोहिमेमुळे इराणला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यांनी दावा केला की इराणची नौदल शक्ती जवळपास संपुष्टात आली आहे, त्यांची वायुसेना कमकुवत झाली आहे आणि अनेक मोठे नेते मारले गेले आहेत. तसेच इराणला “पाषाण युगात” पाठवण्याचा इशाराही त्यांनी दिला. या मोहिमेचा उद्देश इराणची लष्करी ताकद संपवणे हा होता आणि तो आता जवळपास पूर्ण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.


ट्रम्प यांनी विश्वास व्यक्त केला की अमेरिका लवकरच आपली सर्व उद्दिष्टे साध्य करेल. सध्या अमेरिका या युद्धात पूर्वीपेक्षा अधिक मजबूत स्थितीत असून शत्रू सतत कमकुवत होत असल्याचा दावा त्यांनी केला. येत्या २ ते ३ आठवड्यांत इराणवर आणखी कठोर हल्ले केले जातील आणि मिशन “अतिशय लवकर” पूर्ण होईल, असे त्यांनी म्हटले. तसेच, विशेषतः इस्रायलसह आपल्या सहयोगी देशांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ दिले जाणार नाही, याची त्यांनी पुनरुच्चार केला.ते म्हणाले की चर्चा यशस्वी न झाल्यास अमेरिका इराणमधील वीज प्रकल्प आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करू शकते. याशिवाय त्यांनी इतर देशांना स्ट्रेट ऑफ होर्मुजसारख्या महत्त्वाच्या समुद्री मार्गांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेण्याचे आवाहन केले.


ट्रम्प यांनी म्हटले की हे युद्ध अमेरिका आणि जगाच्या सुरक्षेसाठी आवश्यक होते. त्यांच्या मते, इराण दीर्घकाळापासून दहशतवादाला पाठिंबा देत असून तो अण्वस्त्र निर्मितीच्या अत्यंत जवळ पोहोचला होता. अमेरिका कोणत्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्र मिळवू देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, कूटनीती हा अमेरिकेचा पहिला पर्याय होता; मात्र इराणने सर्व प्रस्ताव नाकारले. तसेच, याआधीच्या हल्ल्यांमध्ये इराणच्या अणुस्थळांना मोठे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला.


ट्रम्प यांनी सांगितले की अलीकडील काळात तेलाच्या किंमती वाढण्यास इराण जबाबदार आहे. त्यांनी आरोप केला की इराणने तेलवाहू जहाजांवर हल्ले करून जागतिक पुरवठ्यावर परिणाम केला आहे.ते पुढे म्हणाले की अमेरिका जगातील सर्वात मोठा तेल आणि वायू उत्पादक देश असून या संकटाला सामोरे जाण्याची त्यांची पूर्ण क्षमता आहे. तसेच त्यांनी सौदी अरेबिया, कतार, यूएई, कुवैत आणि बहरीन यांसारख्या प्रादेशिक सहयोगी देशांचे कौतुकही केले.

Comments
Add Comment

पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षात अमेरिकेची एन्ट्री; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओंच्या विधानाने खळबळ

वॉशिंग्टन : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावाद आणि दहशतवादी हल्ल्यांवरून तणाव वाढत असतानाच

इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त? IAEA प्रमुखांच्या एका विधानामुळे उडाली खळबळ!

आल्बनी: अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यानंतर इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत एक अत्यंत मोठा आणि धक्कादायक

Somalia Attack: सोमालियात अल-कायदाशी संबंधित अल-शबाबच्या भीषण हल्ल्यात 20 सैनिकांचा मृत्यू, लष्कराच्या दाव्याने खळबळ

मोगादिशू: सोमालियाची राजधानी मोगादिशूमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. अल-कायदाशी संबंधित असलेल्या

Spain Train Accident : स्पेनमध्ये रेल्वेचा भीषण अपघात : दोन हाय-स्पीड ट्रेनच्या धडकेत ४६ जणांचा मृत्यू; माद्रिद-अंदालुसिया रेल्वे सेवा ठप्प!

माद्रिद : स्पेनच्या मध्यवर्ती भागात एका अत्यंत भीषण रेल्वे दुर्घटनेत किमान ४६ लोकांचा मृत्यू झाल्याची अतिशय

Cyclone Arnab News : बंगालच्या उपसागरात ''अर्णब'' चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागासाठी प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'अर्णब' (Cyclone Arnab) नावाचे चक्रीवादळ आता अधिकच भयानक रूप धारण करत आहे. हवामान

दुबईचा 'गोल्डन रोड'! 'त्या' मार्गाची नेमकी भानगड काय? जाणून घ्या

सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत आणि सामान्य व्यक्तीला ते घेणं परवडत देखील नाही. असं असताना दुबईत मात्र गोल्डन रोड