Sanika Shah: मुंबईतील सानिका शाहची एव्हरेस्ट मोहिमेकडे वाटचाल; भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : मुलुंड येथील २१ वर्षीय गिर्यारोहक सानिका जिगर शाह एव्हरेस्ट सर करण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. ती ९ एप्रिल रोजी मुंबईहून काठमांडूसाठी रवाना होणार असून जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याचा तिचा मानस आहे.


शनिवारी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी सानिकाला शुभेच्छा देत तिच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला. सानिकाचे शिखर सर करण्याचे स्वप्न पूर्ण होवो. ती केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशातील तरुणांसाठी एक आदर्श आहे, असे आमदार मिहीर कोटेचा म्हणाले.


गेल्या साडेचार वर्षांत सानिकाने गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपली ठळक छाप पाडली आहे. तिच्या जिद्द, सहनशक्ती आणि तांत्रिक कौशल्याचे आमदार मिहिर कोटेचा यांनी कौतुक केले. अल्पवयातच तिने नेपाळमधील हिमलुंग हिमाल (७,१२६ मीटर) सर करून पहिली भारतीय महिला तसेच सर्वात तरुण भारतीय होण्याचा मान मिळवला आहे, असे आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले.



सानिकाची गिर्यारोहणातील कामगिरी



सानिकाने विविध खंडांतील अनेक आव्हानात्मक शिखरे सर केली आहेत. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलिमांजारो (५,८९५ मीटर) आणि युरोपमधील सर्वोच्च शिखर एल्ब्रुस (५,६४२ मीटर) ही शिखरे सर करून तिने उत्तुंग यश मिळविले आहे.


भारतामध्ये तिने लडाखमधील कांग यात्से II (६,२५० मीटर), फ्रेंडशिप पीक (५,२८९ मीटर) आणि पंगारचुल्ला पीक (४,५९० मीटर) ही आव्हानात्मक शिखरे सर केली आहेत. तसेच अन्नपूर्णा बेस कॅम्प आणि फुलारा रिज हे कठीण ट्रेक्सही तिने यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर