Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्यासाठी आणि बारामतीच्या विकासासाठी झोकून दिलं, त्या लाडक्या अजितदादांची उणीव आज पावलापावलावर भासत आहे. मात्र, दादांनी पाहिलेली स्वप्नं आणि त्यांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी दादांची सावली आणि आता बारामतीची 'माऊली' सुनेत्रा वहिनी खंबीरपणे उभ्या आहेत," अशा शब्दांत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित सभेत बावनकुळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि महायुतीचे इतर मान्यवर नेते उपस्थित होते.


बावनकुळे म्हणाले की, "आजचा दिवस ऐतिहासिक आहे, पण तितकाच मनावर दडपण आणणाराही आहे. महाराष्ट्राचे लोकनेते आणि 'विकास पुरुष' अजितदादा आज आपल्यात नाहीत, ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. गडचिरोलीपासून अमरावतीपर्यंत असा एकही कानाकोपरा नाही जिथे दादांच्या कार्याचा ठसा नाही. शेतकऱ्याच्या शेतात पोहोचलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा अजितदादांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहे."


सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले, "माझे दादांशी ३२ वर्षांचे कौटुंबिक संबंध आहेत. दादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र दुःखात असताना, सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या १४ कोटी जनतेसाठी आणि दादांची स्वप्ने जिवंत ठेवण्यासाठी ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्या केवळ उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर अजितदादांच्या सावलीतून बाहेर पडून आता बारामतीकरांच्या 'माऊली' म्हणून खंबीरपणे उभ्या आहेत. विधिमंडळात आणि मंत्रिमंडळात त्यांनी आपल्या कामाची छाप पाडायला सुरुवात केली आहे."



काँग्रेसला जाहीर आवाहन: ही निवडणूक प्रतिष्ठेची करू नका


बावनकुळे यांनी विरोधी पक्षांना, विशेषतः काँग्रेसला थेट आवाहन केले. "महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आणि संस्कार आहेत. अजितदादांनी आपल्या राजकीय जीवनातील ८० टक्के काळ ज्यांच्यासोबत काम केले, त्या काँग्रेस नेत्यांना माझी विनंती आहे की, या जागेवर निवडणूक लढवून तुम्ही दादांच्या स्मृतींचा अनादर करू नका. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची भावना आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. जर तुम्ही जनभावनेचा अनादर केला, तर बारामतीकर तुमचा असा दारूण पराभव करतील जो इतिहासात कधी झाला नसेल," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.



बारामतीचा विजय ऐतिहासिक ठरणार


बावनकुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा हा विजय महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय असेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments
Add Comment

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु